IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या हंगामात 8 ऐवजी 10 संघ खेळणार आहेत. यामुळं यंदाचा हंगाम प्रेक्षकांसाठी आणखी मनोरंजक ठरणार आहे. लखनौ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन फ्रँचायझी आयपीएल ट्रॉफीसाठी रिंगणात उतरणार आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही प्रत्येक संघाला साखळी फेरीत 14 सामने खेळायचे आहेत. प्लेऑफचा फॉरमॅट प्रत्येक वेळी सारखाच असणार आहे. म्हणजेच, यावेळीही प्लेऑफमध्ये दोन क्वालिफायर आणि एक एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात काही असे संघ आहेत, ज्यांनी सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये ऐन्ट्री केली आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नईनंतर कोणत्या संघानं आयपीएलच्या प्लेऑफमध्ये सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे.
चेन्नई सुपर किंग्ज
दोन वर्ष निलंबित राहिल्यानंतरही चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये सर्वाधिक प्लेऑफ सामने खेळणार संघ ठरलाय. चेन्नई आतापर्यंत 24 प्लेऑफ सामने खेळले आहेत. आयपीएल 2020 पर्यंत चेन्नईचा संघ पहिल्यांदा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. चेन्नईच्या संघानं आतापर्यंत चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकलीय.
मुंबई इंडियन्स
आयपीएलमध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकलेल्या संघाच्या यादीत मुंबईचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या संघानं आतापर्यंत आयपीएलच्या पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. परंतु, प्लेऑफचे सामने खेळणाऱ्या संघाच्या यादीत मुंबईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईनं आतापर्यंत 18 प्लेऑफचे सामने खेळले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात मुंबईच्या संघाची कामगिरी निराशाजक राहिली. यामुळंच मुंबईचा संघ प्लेऑफच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या संघानं 2013 मध्ये आयपीएलची पहिली ट्रॉफी जिंकलीय. आयपीएलच्या मागच्या हंगामात मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नव्हतं.
कोलकाता नाईट रायडर्स
कोलकाता नाईट रायडर्सनं आतापर्यंत आयपीएलचे 13 प्लेऑफ सामने खेळले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या कोलकाताच्या संघानं 2012 आणि 2014 मध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर कोलकातानं प्रत्येक प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. दरम्यान, 2011, 2016, 2017 मध्ये एलिमिनेटर सामन्यात पराभूत होऊन कोलकात्याचा संघ बाहेर पडला. तर, 2018 मध्ये दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकात्याचा पराभव झाला होता.आयपीएलच्या मागच्या हंगमात कोलकात्याचा संघ उपविजेता ठरला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आरसीबीनं आतापर्यंत आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकली नाही. परंतु प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या बाबतीत आरसीबीचा संघ केकेआरच्या बरोबरीत आहे. आरसीबीच्या संघानंही 13 प्लेऑफ सामने खेळले आहेत. 2009, 2011 आणि 2016 मध्ये आरसीबीचा संघ अंतिम फेरीत पोहचला होता.
हे देखील वाचा-
- TATA IPL: आयपीएल 2022 साठी नवे नियम; DRS, Super Over आणि Playing 11 च्या नियमांत मोठा बदल
- Scott Hall dies at 63: डब्लूडब्लूई चाहत्यांसाठी वाईट बातमी, सुपरस्टार स्कॉट हॉल यांचं निधन
- Who Is Sandeep Nangal Ambian: भरमैदानात आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या, कोण होते संदीप नांगल अंबिया?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha