Happy Birtday Krunal Pandya: भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याचा जन्म 24 मार्च 1991 साली गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालाय. क्रुणालसह त्याचा धाकटा भाऊ हार्दिक पांड्यानंही टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत चाहत्यांचं मन जिंकली आहेत. क्रुणाल आणि हार्दिक पांड्याला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांचे वडील हिमांशु पांड्या यांनी खूप मेहनत घेतली होती. 


कृणाल पांड्यानं त्याच्या आयुष्यात खूप आर्थिक संकटाचा सामना केलाय. दुसऱ्यांकडून बॅट घेऊन तो क्रिकेट खेळायचा. परंतु, आज त्याला यशस्वी क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं. क्रुणालनं आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून भारतीय संघात स्थान मिळवलं. भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या उद्देशानं आम्ही भरपूर मेहनत करत होतो. त्यावेळी आमची आर्थिक परिस्थिती खराब होती. यामुळं आम्हाला मॅगी काढून दिवस काढावा लागत होता, असं हार्दिक पांड्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. 


कृणाल पांड्यानं आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बोली लावली होती. क्रुणालनं 2016 साली मुंबईच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. पहिल्याच सामन्यात त्यानं 11 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीनं नाबाद 20 धावा केल्या. यानंतर 4 षटकात केवळ 20 धावा देत एक विकेट्स घेतला. त्यानं मुंबईकडून या खेळाडूनं 84 आयपीएल सामने खेळले. ज्यात त्यानं 1143 धावा आणि 51 विकेट्सही घेतल्या. 


आयपीएलमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या क्रुणाल पांड्याची 2018 साली भारतीय संघात निवड झाली. त्यानं 4 नोव्हेंबर 2018 रोजी ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला.  त्यानंतर गेल्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. कृणालनं भारतासाठी आतापर्यंत 19 टी-20 आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत.


आयपीएलच्या पंधराव्या हंगामात क्रुणाल पांड्या आता लखनौच्या संघाकडून खेळणार आहे.  लखनौ सुपर जायंट्सने त्याला 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याची मूळ किंमत 2 कोटी होती. आयपीएलच्या मागच्या हंगामापेक्षा त्याला अधिक पैसे मिळाले आहेत. 


हे देखील वाचा-