INS vs AUS | सिडनी टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच पुरुषांच्या टेस्ट मॅचमध्ये एक महिला अम्पायर अम्पायरिंग करताना दिसून येणार आहे. क्लेयर पोलोसाक (Claire Polosak) या पहिल्या महिला पंच अधिकारी बनल्या आहेत. ज्या पुरुषांच्या कसोटी सामन्यात अम्पायरिंग करणार आहेत. या सामन्यात क्लेयर पोलोसाक या चौथ्या अम्पायरची भूमिका निभावणार आहेत.


याआधी क्लेयर पोलोसाक यांनी 2019 मध्ये नामीबिया आणि ओमानमध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन टूच्या सामन्यात अम्पायरिंग करण्याची संधी मिळाली होती. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात येणाऱ्या सिडनी कसोटी सामन्यात पॉल रिफेल आणि पॉल विल्सन ग्राउंड अम्पायरची भूमिका निभावणार आहेत.


काय असं चौथ्या अम्पायरचं काम?


मैदानात नवा चेंडू घेऊन येणं, अम्पायर्ससाठी ड्रिंक्स घेऊन जाणं, टी आणि लंच ब्रेक दरम्यान पिचची देखरेख करणं यांसारखी काम चौथ्या अम्पायरच्या देखरेखीखाली करण्यात येतात. अशातच जर कोणत्याही कारणामुळे फिल्ड अम्पायर मैदानात उपस्थित नसतील तर त्यावेळी तिसऱ्या अम्पायरला मैदानावर अम्पायरिंगसाठी जावं लागतं. अशातच चौथा अम्पायर, तिसऱ्या अम्पायरची भूमिका साकारताना दिसून येतो.


सिडनीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना


दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा आज तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या गुणतालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीच्या गुणांवर आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये 2-2 असा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माची संघात वापसी झाली आहे. तर याव्यतिरिक्त नवदीप सैनी आपला डेब्यू सामना खेळणार आहे. त्याचसोबत या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात डेव्हिड वॉर्नर आणि विल पुकोवस्की यां दोघांचा समावेश केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या :