IND Vs AUS 3rd Test Live Score Updates | विहारी-अश्विनची चिवट फलंदाजी, सिडनी कसोटी अनिर्णित

IND Vs AUS Sydney Test Live Score Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. सिडनी कसोटीसाठी दोन्ही संघात प्रत्येकी दोन बदल करण्यात आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jan 2021 01:06 PM

पार्श्वभूमी

IND Vs AUS Sydney Test Live Score Updates : सिडनी कसोटीचा दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी चांगला ठरला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने दोन...More

हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या चिवट खेळीमुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. आर अश्विनने 130 आणि हनुमा विहारीने 160 चेंडू खेळून काढले. त्यामुळे भारताने या सामन्यात पराभव टाळला. विशेष म्हणजे दुखापत होऊनही हनुमा विहारीने 160 चेंडू खेळला. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या स्वप्नांवर विहारी आणि अश्विन यांनी विरजण टाकलं. परिणामी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.