Star Sports & Sony Sports : भारतीय प्रसारकांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मीडिया राईट्सच्या लिलावावर बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे. भारतीय प्रसारकांच्या या धमकीमुळे आयसीसी नाराज असून आयसीसीने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. पण भारतीय प्रसारकांनी आयसीसीच्या निविदा प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. 


नुकतंच आयसीसीने मीडिया राईट्स लिलावापूर्वी मॉक ऑक्शनचं आयोजिन केलं होतं. यावेळी भारतातील टॉप-4 ब्रॉडकास्टर्स स्टार स्पोर्ट्स, सोनी स्पोर्ट्स, झी आणि वायकॉम18 या मॉक ऑक्शनमध्ये सहभागी झाले नाहीत. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ''हे खरोखरच धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे. भारतीय प्रसारकांनी दाखवलेली ही वागणूक योग्य नाही.'' तसंच''आम्ही जवळपास प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे, परंतु असे असतानाही भारतीय प्रसारकांची ही वृत्ती आश्चर्यकारक आहे.'' असंही ते म्हणाले.


16 ऑगस्ट मॉक ऑक्शनचा शेवटचा दिवस


आयसीसीकडून मॉक ऑक्शनचं आयोजन 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं होतं. पण आतापर्यंत भारतीय ब्रॉडकास्टर्सनी या मॉक ऑक्शनमध्ये सहभाग घेतलेला नाही. दरम्यान या मॉक ऑक्शनची तारीख 17 ऑगस्टपर्यंत वाढवली जाऊ शकते. पण आतापर्यंत असं कोणतही अधिकृत वक्तव्य आयसीसीकडून समोर आलेलं नाही. दरम्यान हा मॉक ऑक्शन संपण्याआधी भारतीय ब्रॉडकास्टर्स यामध्ये सहभागी होतात की नाही, हे पाहण महत्त्वाचं ठरेल.


ICC टी20 विश्वचषकासाठी सज्ज


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.


यंदाच्या विश्वचषकात कसे असतील ग्रुप?


ग्रुप-1: इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान आणि अन्य दोन क्वालिफायर 
ग्रुप-2: भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि अन्य दोन क्वालिफायर 


हे देखील वाचा-