Rohit Sharma and Ritika Sajdeh : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पत्नी रितिका सजदेहसोबतचा (Ritika Sajdeh) एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह अगदी हॅप्पी-हॅप्पी दिसत आहेत. यासोबतच फोटोच्या कॅप्शनमध्ये 'या वर्षाचा सर्वोत्तम काळ' असं रोहितनं लिहिलं आहे. दोघेही समुद्रकिनारी दिसून येत असल्याने या रोमॅटिंक फोटोसह सुंदर कॅप्शनमुळे रोहित शर्माची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील आयपीएल टीम मुंबई इंडियन्सने त्यांच्या (Mumbai Indians) अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरुन या पोस्टवर कमेंट केली आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्सही या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


रोहित शर्माने जवळपास 4 तासांपूर्वी (बातमी लिहिताना) इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे आणि या इतक्या वेळातच पोस्टला जवळपास 8 लाख लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करुन देखील आपलं प्रेम दाखवत आहेत. रोहित आणि रितीका एक प्रसिद्ध कपल असून दोघांच्या सोशल मीडिया पोस्ट कायम चर्चेत असतात. दरम्यान रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने कसोटी मालिकेत टीम इंडियाचा भाग नव्हता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने टीम इंडियाचे नेतृत्व केले. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. पण, आता रोहित शर्मा दुखापतीतून सावरला आहे.


पाहा रोहितची इन्स्टाग्राम पोस्ट-






रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध करणार पुनरागमन


रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन करणार आहे. याशिवाय श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्यात आलं आहे. बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे.


श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग


हे देखील वाचा-