Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपट्टू शेन वॉर्नचे (Shane Warne) काल वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने शेन वॉर्नचे निधन झाले. शेन वॉर्नचे निधन हा ऑस्ट्रेलियासह सर्वच क्रिकेटप्रेमींसाठी धक्का मानला जात आहे. त्याच्या निधनावर सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. भारतीय खेळाडूंनी देखील शेन वॉर्नच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आयुष्य हे खूप अनपेक्षित असते. आपल्या खेळातील एक दिग्गज आणि वैयक्तिकरित्या मी ओळखत असलेला एक असाधारण माणूस गमावला आहे. चेंडू वळवणारा सर्वात मोठा कलाकार होता, अशा शब्दात भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने शेन वॉर्नला आदरांजली वाहिली आहे. शेन वॉर्नचे निधन होणे हा मोठा धक्का असल्याचे कोहलीने म्हटले आहे.


विरोट कोहलीबरोबच अन्य भारतीय खेळाडूंनी देखील शेन वॉर्नच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. अत्यंत दुखद बातमी आहे. आज आपण खेळाचा एक दिग्गज आणि विजेता खेळाडू गमावला आहे. अजूनही विश्वास बसत नसल्याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटले हे. तर शेन वॉर्न याच्या नेतृत्वात आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात करणारा भारताचा प्रमुख अष्टपैलू रवींद्र जडेजाने देखील ट्विट करत शेन वॉर्नला आदरांजली अर्पण केली आहे. ही बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. आपल्या खेळातील शन वॉर्न हा एक महान व्यक्ती होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो, असे ट्वीट रवींद्र जडेजाने केले आहे.


ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर शेन वॉर्न याचे काल निधान झाले. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराचा  झटका आल्याने थायलंड येथे निधन झाले. क्रिकेटर शेन वॉर्नने काही दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेन युद्धावर आपली प्रतिक्रिया दिली होती. शेन वॉर्न यांनी युक्रेनच्या बाजूने एक संदेश दिला होता आणि रशियाच्या कारवाईला पूर्णपणे चुकीचे म्हटले होते. ऑस्ट्रेलियासाठी हा दुसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे निधन झाले त्यानंतर आता शेन वॉर्नच्या निधनाची बातमी समोर आल्याने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. 


शेन वॉर्नची कारकीर्द


जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती आहे. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवल्या आहेत. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: