Sarfaraz Khan Marriage : मुंबईतील क्रिकेटपटू आणि आयपीएल (IPL) स्टार सरफराज खान (Sarfaraz Khan) लग्नबंधनात अडकला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळणाऱ्या सरफराज खानने जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील तरुणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. सरफराज मॅच पाहायला आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला आणि त्याने गुपचुप लग्न उरकलं आहे. सरफराज खाननं काश्मीरमधील रोमाना जहूर या तरुणीसोबत लग्न केलं आहे. काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील पशपोरा गावात हा लग्नसोहळा पार पडला. सरफराजच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


IPL स्टार सरफराज खान अडकला लग्नबंधनात


स्टार क्रिकेटर सरफराज खानने गाजावाजा न करता गुपचुप लग्न केलं आहे. आता सरफराज खान आणि पत्नी रोमाना यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. निकाहच्या फोटोंमध्ये सरफराज, रोमाना आणि त्यांचे कुटुंबिय खूप आनंदी दिसत आहेत. या फोटोंमध्ये सरफराज काळ्या शेरवानीमध्ये तर रोमाना लाल आणि गोल्डन रंगाच्या लेहेंग्यामध्ये सुंदर दिसत आहे. या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे.






कशी झाली सरफराज खान आणि रोमानाची भेट


सरफराज खान आणि रोमाना यांची लव्हस्टोरीही इंटरेस्टिंग आहे. सरफराज खान मॅच पाहायला आलेल्या तरुणीच्या प्रेमात पडला. सरफराज खान आणि रोमाना जहून यांची पहिली भेट दिल्लीमध्ये झाली, तेव्हा रोमाना मॅच पाहण्यासाठी पोहोचली होती. त्यानंतर सरफराज आणि रोमाना यांची मैत्री झाली. यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर सरफराजचे कुटुंबिय रोमानाच्या कुटुंबियांकडे लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले आणि सर्वसंमत्तीने दोघांचं लग्न पार पडलं आहे.


पाहा सरफराज खानच्या लग्नातील व्हायरल व्हिडीओ :






सरफराज खान मुंबईतील स्टार क्रिकेटर


सरफराज खाननं इंडियान प्रीमियर लीगमध्ये चांगली खेळी केली आहे, तो मुंबईतील स्टार क्रिकेटर आहे. सध्या सरफराज खान आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. त्याआधी सरफराज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजा किंग्स संघाकडूनही खेळला आहे. सरफराज खानला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. तो टीम इंडियाच्या अंडर-19 संघाचा भाग होता.