ICC ODI Ranking: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज पुन्हा एकदा चौघांना ओलांडून आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत तिने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.


इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी
इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा 1-2 असा पराभव झाला असला तरी कर्णधार मिताली राजने या मालिकेत चमकदार कामगिरी केली. 38 वर्षीय मितालीने तिन्ही सामन्यात अर्धशतक झळकावली. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात तिने 72 आणि 59 धावा केल्या. तर तिसर्‍या सामन्यात नाबाद 75 धावांमुळे भारत सामना जिंकण्यात यशस्वी झाला.


2018 मध्येही अव्वल स्थानी
मिताली राजने यापूर्वी फेब्रुवारी 2018 मध्ये क्रमवारीत अव्वल स्थान गाठले होते. एप्रिल 2005 मध्ये मिताली प्रथम क्रमांकावर आली होती. त्यावेळी तिने न्यूजीलंडविरुद्ध पोटचेफस्ट्रूममध्ये विश्वचषकात नाबाद 91 धावा फटकावल्या होत्या. पहिल्यांदा आणि शेवटच्यावेळी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असण्यामधील अंतर 16 वर्षांचे आहे. कोणत्याही महिला फलंदाजासाठी हे सर्वात जास्त आहे.


शेफाली, झुलन आणि दीप्ती यांनी आपलं स्थान सुधारलं
भारताच आक्रमक सलामीवीर शेफाली वर्माने शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये 44 आणि 19 धावा फटकावून 49 नंबरची मोठी झेप घेत 71 व्या क्रमांकावर पोहचली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने चार स्थानांची कमाई केली असून ती 53 व्या स्थानावर आहेत. गोलंदाजांच्या यादीत अष्टपैलू दीप्ती शर्मा एका स्थानाने झेप घेत 12 व्या स्थानावर गेली आहे. अंतिम सामन्यात तिने 47 धावा देऊन तीन बळी घेतले होते.