Team India: टीम इंडियाने (Team India) नुकतीच श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळली. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने 3-0 अशा विजय मिळवला. मात्र एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. आता टीम इंडिया 40 दिवसांची विश्रांती घेणार आहे. टीम इंडिया फक्त टेस्ट आणि टी-20 मालिका खेळणार आहे. बांगलादेश क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यापासून टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरणार आहे. 


भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार आहे. हा सामना 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 9 ऑक्टोबरला दिल्लीत खेळवला जाईल. तिसरा आणि शेवटचा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणार आहे.


बांगलादेशनंतर न्यूझीलंडचा सामना-


बांगलादेशपाठोपाठ टीम इंडियाला न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कसोटी सामन्यात खूप मेहनत करावी लागेल.


27 वर्षांनंतर श्रीलंकेचा विजय-


श्रीलंकेनं सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनात ही पहिला मालिका जिंकली आहे. भारतानं यापूर्वी 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली होती. त्या मालिकेत सनथ जयसूर्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला होता. श्रीलंकेच्या फिरकीपटूंपुढे टीम इंडियाच्या फलंदाजांना अपयश आलं. भारताने तब्बल 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली. 1997 नंतर श्रीलंकेच्या संघाने पहिल्यांदाच भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.


रोहित शर्मा पराभवानंतर काय म्हणाला होता?


श्रीलंकेच्या संघानं आमच्या पेक्षा चांगला खेळ केला, त्यांना विजयाचं श्रेय दिलं पाहिजे, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला. आमच्यासमोर काही समस्या आहेत. आम्हाला गांभीर्यानं वैयक्तिक गेम प्लानवर लक्ष द्यावं लागेल. आजच्या सामन्यात आम्ही काही काळ दबावात होतो, आम्ही इथं प्रत्येक सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीलंकेनं या मालिकेत चांगला खेळ केला. त्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल, असंही रोहित शर्मा म्हणाला. 


संबंधित बातमी:


विनेश फोगाटच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, सीएएसही पेचात; पदक मिळणार जवळपास निश्चित?, महत्वाची माहिती समोर