Indian Cricket Team Tour Of South Africa: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) आपल्या पुढील मोहिमेसाठी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) रवाना झाला आहे. 10 डिसेंबरपासून टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील टी-20 सीरिजनं (T-20 Series) सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यानंतर वनडे (ODI Series) आणि टेस्ट सीरिजही (Test Series) खेळवली जाईल. आता टीम इंडियाची पहिली तुकडी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली आहे, ज्यामध्ये टी-20 संघातील बहुतांश खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) दोघे फक्त इंट्रा मॅच आणि टेस्ट स्क्वाड्सचा भाग असणार आहेत, त्यामुळे दोघे पहिल्या बॅचसोबत दक्षिण आफ्रिकेला गेलेले नाहीत. 


याशिवाय, या बॅचमध्ये असे खेळाडू देखील आहेत, जे तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा भाग असणार आहेत, ज्यात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), मुकेश कुमार (Mukesh Kumar) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचा समावेश आहे. याशिवाय, टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या नेतृत्वाखालील कोचिंग स्टाफ बॅचमध्ये उपस्थित आहेत. बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतीय खेळाडूंनी उड्डाण केलं असून काही तासांतच ते दक्षिण आफ्रिकेला पोहोचतील.


रोहित, विराट संघासोबत दक्षिण आफ्रिकेला का गेले नाहीत?


भारताच्या 'अ' संघासह एकूण 47 खेळाडू आफ्रिका दौऱ्यासाठी जाणार आहेत. तर, टी-20 मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळणारा सूर्यकुमार यादव फॉरमॅट मालिकेनंतर विश्रांतीसाठी मायदेशी परतणार आहे. याशिवाय विराट कोहली आणि रोहित शर्मा 20 ते 22 डिसेंबर दरम्यान खेळल्या जाणार्‍या इंट्रा सकॉव्ड सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये सामील होतील. आफ्रिका दौऱ्यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली, ज्यामध्ये जवळपास सर्व वरिष्ठ खेळाडूंनी विश्रांती घेतली आणि सूर्यकुमार यादवनं संघाची कमान सांभाळली.


दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टेस्ट स्क्वॉड  


रोहित शर्मा (Rohit Sharma) (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली (Virat Kohali), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) , ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), ईशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.


दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वनडे स्क्वॉड  


ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, दीपक चाहर. 


दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी20 स्क्वॉड  


सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


"तुम्हाला मला टी-20 वर्ल्डकपमध्ये घ्यायचं असेल तर..." रोहित शर्माचा स्पष्ट प्रश्न, BCCI अधिकाऱ्यांनीही सांगितली 'मन की बात'!