नवी दिल्ली : भारतानं आतापर्यंत चारवेळा वर्ल्ड कप (World Cup 2024) जिंकला आहे. यामध्ये दोन वनडे वर्ल्ड कप आणि दोन टी 20 वर्ल्ड कप चा समावेश आहे. भारतानं 1983 ला पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर भारतानं 2007 मध्ये पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला. 2011 मध्ये पुन्हा एकदा वर्ल्ड कप भारतानं जिंकला. त्यानंतर पुन्हा एकदा 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. यापैकी तीन वर्ल्डकप भारतानं कॅच मुळं जिकंला. 


भारतानं कपिल देव यांच्या नेतृत्त्वात 1983 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतानं 2007 आणि   2011 मध्ये विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. यापैकी 1983, 2007 आणि 2024 चा वर्ल्ड कॅच मुळं जिंकला आहे. 


1983 च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देवचा कॅच


भारतानं 1983 चा वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत केलं. भारतानं वेस्ट इंडिजला 184 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वेस्ट इंडिजचे विव रिचर्डस शानदार फलंदाजी करत होते. मदनलाल च्या बॉलिंगवर त्यांनी जोरदार फटका मारला. कपिल देव यांनी कॅच घेतला अन् मॅच भारताच्या बाजूनं झुकली.  






2007 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीसंतचा कॅच


पहिल्या  टी 20 वर्ल्ड कपच्या 2007 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनलची मॅच झाली. पाकिस्तानला अखेरच्या ओव्हरमध्ये 13 धावा हव्या होत्या. मिसबाह उल हक आणि उमर गुल मैदानात होते. पहिल्या दोन बॉलमध्ये पाकिस्ताननं 7 धावा गेल्या होत्या. पाकिस्तानला 4 बॉलमध्ये 6 धावा हव्या होत्या. तिसऱ्या बॉलवर मिसबाहनं स्कूप शॉट मारला आणि फाईन लेगला असलेल्या श्रीसंतनं कॅच घेतला अन् भारतानं  टी20 वर्ल्ड कप उंचावला. 






सूर्यकुमार यादवनं घेतलेला कॅच अन् रोहितचं स्वप्न पूर्ण 


2024 टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. हार्दिक पांड्याच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर डेव्हिड मिलरनं मोठा फटका मारला. सूर्यकुमार यादवनं बाऊंड्रीवर अप्रतिम कॅच घेतला. या कॅचनंतर मॅच पूर्णपणे भारताच्या हातात आली. भारतानं दक्षिण भारताला 7 धावांनी पराभूत केलं. रोहित शर्माचं टी 20 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण केलं. रोहित शर्माच्या टीमनं इतिहास घडवत दुसऱ्यांदा मॅचवर नाव कोरलं. भारतानं चारवेळा आयसीसीचे वर्ल्ड कप जिंकले त्यापैकी एक वर्ल्ड कप फलंदाजीच्या जोरावर जिंकला तो म्हणजे  2011 चा होय. तर, इतर तीन वर्ल्ड कप भारतानं अप्रतिम कॅचच्या मदतीनं जिंकले.




संबंधित बातम्या :



Suryakumar Yadav : 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमधील चूक टाळली, टीम इंडियानं वर्ल्ड कोणत्या रणनीतीनं जिंकला, सूर्यानं सगळं सांगितलं