India vs West Indies, Day 1 Live Score : यजमान वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी वनडे स्टाईल सुरुवात केली. दोन्ही सलामी फलंदाजांनी पहिल्या कसोटी प्रमाणे आक्रमक सुरुवात केली. पहिल्या कसोटी सामन्यात या जोडीने द्विशतकी भागिदारी केली. दुसऱ्या कसोटी सामन्यातही या जोडीने दमदार सुरुवात केली.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी आक्रमक सुरुवात केली. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात या जोडीने धावांचा पाऊस पाडला. या जोडीने २६ षटकात नाबाद १२१ धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल जोडीपुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज प्रभावहिन दिसत होते. भारतीय फलंदाजांनी सहजासहजी धावा चोपल्या. वेस्ट इंडिजच्या पाच गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आलेय. रोहितने आपल्या कसोटी कारकीर्दीतील 15 वे अर्धशतक पूर्ण केले.
पहिल्या सामन्यात रोहित व यशस्वी यांच्या शतकांच्या जोरावरच भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. या दोघांनी पहिल्या सामन्यात 200 धावांची विक्रमी भागीदारी केलेली. या सामन्यात देखील त्यांनी तसाच खेळ सुरू केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २६ षटकात बिनबाद १२१ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने प्रथम अर्धशतक झळकावले. त्यानंतर युवा यशस्वी जयस्वाल यानेही अर्धशतक ठोकले. दोघांनी वनडे स्टाईल फलंदाजी केली. पहिल्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल ५६ चेंडूत ५२ धावांवर खेळत होता. या खेळीत यशस्वी जयस्वाल याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. दुसरीकडे रोहित शर्मा याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप घेतले. रोहित शर्माने १०२ चेंडूत नाबाद ६३ धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकार आणि दोन षटकाराचा समावेश आहे.
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील १०० वा कसोटी सामना होय. दुसरीकडे विराट कोहलीचा हा ५०० वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होय. भारतीय संघात एक बदल करण्यात आलाय. दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड शार्दूल ठाकूर याला संघातून बाहेर ठेवण्यात आलेय. युवा मुकेश कुमार याला पदार्पणाची संधी दिली आहे. पाहा दोन्ही संघाची प्लेईंग -
वेस्ट इंडिज प्लेइंग इलेवन :
क्रॅग ब्रैथवेट (कर्णधार), तेजनारायण चंद्रपॉल, किर्क मॅकेंजी, जर्मेन ब्लॅकवुड, एलिक अथानाज़, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमर रोच, जोमेल वारिकन, शैनन गेब्रियल
टीम इंडियाची प्लेइंग इलेवन :
यशस्वी जयसवाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनादकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज