IND vs WI, 1st Test LIVE : भाराताचा वेस्ट इंडजवर विजय ; लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

India vs West Indies, Day 3 Live Score : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात भारतीय संघ करणार आहे. नव्या उमेदीने टीम इंडिया मैदानात उतरेल.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 15 Jul 2023 02:06 AM
वेस्ट इंजिजला सातवा धक्का

वेस्ट इंडिजने १०० धावांत सात विकेट गमावल्या... अश्विनने चौथी विकेट घेतली. अल्जारी जोसेफ १३ धावांवर बाद

वेस्ट इंडिजला सहावा धक्का

वेस्ट इंडिजला सहावा धक्का बसला आहे.  अथनाजे २८ धावांवर बाद झाला. अश्विनने घेतली तिसरी विकेट

वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत

वेस्टइंडीजचा अर्धा संघ तंबूत.. सिराजने घेतली विकेट

जडेजा - अश्विनचा भेदक मारा

जडेजा आणि अश्विन यांनी भेदक मारा केला. दोघांनी वेस्टइंडीजच्या 2-2 विकेट घेतल्या आहेत. विंडीज 4 बाद 32 धावा

वेस्ट इंडिजला लगोपाठ दोन धक्के

वेस्टइंडीजची दयनीय अवस्था.. 34 धावांत 4 विकेट गमावल्या

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का बसला आहे. क्रेग ब्रेथवेट 7 धावांवर बाद झाला. आर. अश्विनने घेतली विकेट

वेस्ट इंडिजला पहिला धक्का

चंद्रपॉलच्या रुपाने वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसला आहे. रविंद्र जाडेजा याने चंद्रपॉल याला तंबूत पाठवले. 

भारताने डाव घोषित केला

415 धावांवर भारताने डाव घोषित केला आहे. भारताकडे 271 धावांची आघाडी आहे. 

भारताला मोठा धक्का

विराट कोहली 76 धावांवर बाद झालाय. भारताला पाचवा धक्का बसलाय. भारताकडे 255 धावांची आघाडी झाली आहे. 

दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात

दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात झाली. विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा मैदानात

पहिल्या सत्राचा खेळ संपला

तिसऱ्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ संपला.  भारत 4 बाद 400 धावा....  विराट कोहली 72 आणि रविंद्र जाडेजा 21 धावांवर खेळत आहेत. भारताकडे 250 धावांची आघाडी...

भारताकडे मोठी आघाडी

भारताने चार विकेटच्या मोबदल्यात 395 धावा केल्या आहेत. विराट कोहली 67 तर जडेजा 21 धावांवर खेळत आहे. भारताकडे 245 धावांची आघाडी झाली आहे.

विराट कोहलीचे अर्धशतक

विराट कोहलीने 147 चेंडूत दोन चौकारासह अर्धशतक झळकावले.. 

भारताला लागोपाठ दुसरा धक्का

अजिंक्य रहाणेच्या रुपाने भारताला आज दुसरा धक्का बसला... अजिंक्य रहाणे तीन धावांवर भाद झाला.. भारत 4 बाद 356 धावा......  

भारताला तिसरा धक्का

यशस्वी जयस्वालच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. यशस्वी जयस्वाल 171 धावांवर बाद झाला. टीम इंडिया तीन बाद 350 धावा... भारताकडे 200 धावांची आघाडी

यशस्वी जयस्वालचे दीडशतक

यशस्वी जयस्वालचे दीडशतक पूर्ण झालेय. यशस्वीने 361 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले आहेत. 

थोड्याच वेळात तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार

थोड्याच वेळात तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होणार आहे. यशस्वी जयस्वाल 143 तर विराट कोहली 36 धावांवर खेळत आहेत. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने दोन बाद 312 धावा केल्या आहेत. यभारताकडे 162 धावांची आघाडी

दुसऱ्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत

दुसऱ्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत आहे. भारतीय संघाने दोन बाद ३१२ धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल १४३ आणि विराट कोहली ३६ धावांवर खेळत आहेत. भारताकडे 162 धावांची आघाडी

भारताची आघाडी १५० धावांची

भारताची आघाडी १५० धावांची झाली आहे. विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार फलंदाजी करत भारताची धावसंख्या वाढवली आहे. भारत दोन बाद ३०४ धावा

विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल जोडी जमली

रोहित शर्मा आणि शुभमन गिल लागोपाठ बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल जोडी जमली आहे. १५० चेंडूत या जोडीने अर्धशतकी भागिदारी पूर्ण केली. भारत दोन बाद २९२ धावा.. टीम इंडियाकडे १४२ धावांची आघाडी

विरेंद्र सेहवागला टाकले मागे

माजी कर्णधार विराट कोहलीने आठ हजार ५०० धावांचा पल्ला पार केला आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्य स्थानावर पोहचला आहे. विराट कोहलीने ११० व्या सामन्यात ८५०० धावांचा पल्ला पार केला आहे. विराट कोहलीने विरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. विराट कोहलीच्या पुढे आता लक्ष्मण, गावस्कर, द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे फलंदाज आहेत.

विराट कोहलीच्या नावावर विक्रमाची नोंद

विराट कोहलीने कसोटीमध्ये ८५०० धावांचा टप्पा पार केला.

भारताकडे 100 धावांची आघाडी

भारताकडे 102 धावांची आघाडी झाली आहे. विराट कोहली आणि यशस्वी मैदानावर आहेत. रोहित शर्मा आणि गिल बाद झालेत. भारत 2 बाद 252 धावा

भारताला दुसरा धक्का

शुभमन स्वस्तात बाद झाला.... भारताला दुसरा धक्का बसला. भारताकडे 95 धावांची आघाडी

भारताला पहिला धक्का

रोहित शर्माच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. शतकानंतर रोहित शर्मा बाद झाला आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागिदारी केली. भारताकडे 79 धावांची आघाडी आहे. 

रोहित शर्माचाही शतकी तडाखा

यशस्वी जयस्वाल याच्यानंतर रोहित शर्मानेही शतक झळकावले. रोहित शर्माने 220 चेंडूत शतक केले. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी आतापर्यंत 229 धावांची भागिदारी केली आहे. भारतीय संघाकडे 79 धावांची आघाडी झाली आहे.

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी द्विशतकी भागिदारी केली

रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी द्विशतकी भागिदारी केली... भारतीय संघाकडे 58 धावांची आघाडी

यशस्वी जयस्वालने पदार्पणात शतक

यशस्वी जयस्वालने पदार्पणात शतकी खेळी केली. यशस्वीने 215 चेंडूत शतक झळकावले.

150 धावांची भागिदारी

रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी बिनबाद 150 धावांची भागिदारी केली आहे. यासह वेस्ट इंडिजच्या 150 धावांची बरोबरी केली.

पहिल्या सत्राचा खेळ संपला

पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी बिनबाद 146 धावांची भागिदारी केली आहे. भारतीय संघ अद्याप 4 धावांनी पिछाडीवर आहे.

यशस्वीनंतर रोहितचेही अर्धशतक

यशस्वी जायस्वालनंतर रोहित शर्मानेही अर्धशतक झळकावले आहे. भारतीय संघ 18 धावांनी पिछाडीवर आहे. रोहित आणि यशस्वी यांनी नाबाद 132 धावांची सलामी दिली. 

यशस्वी जायस्वालचे पदार्पणात अर्धशतक

यशस्वी जायस्वालने पदार्पणात अर्धशतक झळकावले आहे. भारतीय संघ बिनबाद 104 धावा झाल्या आहेत. भारत फक्त 46 धावांनी पिछाडीवर आहे.

भारत 68 धावांनी पिछाडीवर

वेस्ट इंडिजला 150 धावांवर रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दमदार सुरुवात केली आहे. यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा खेळत आहे. भारत बिनबाद 82 धावांवर आहे. भारतीय संघ अद्याप 68 धावांनी पिछाडीवर आहे.

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल मैदानात आले आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत बिनबाद 80 धावा होता.

पहिल्या दिवशी काय झालं ?

India vs West Indies Dominica Test 1st Day: टीम इंडिया (Team India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात बुधवारी डोमिनिकामध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला काल (बुधवारपासून) सुरुवात झाली. सामन्याचा पहिल्या दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या बाजूनं होता. वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावा करुन ऑल आऊट झाला. त्यानंतर भारतानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या. टीम इंडियासाठी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हुकुमी एक्का ठरला. अश्विननं एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 विकेट्स घेत विंडिजच्या संघाचा धुव्वा उडवला. तर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रोहित आणि यशस्वीनंही आपली कमाल दाखवली. 

वेस्ट इंडिजचा डाव 150 धावांत संपुष्टात

वेस्टइंडीज डाव 150 धावात संपुष्टात आला... आर अश्विनी पाच तर रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरला दोन आणि मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली

वेस्ट इंडिजला नववा धक्का

148 धावांवर वेस्ट इंडिजला नववा धक्का बसला आहे. अश्विन 4 तर जडेजाने 3 विकेट घेतल्या...

वेस्ट इंडिजला आठवा धक्का

वेस्ट इंडिजला 8 वा धक्का

वेस्ट इंडिजला सातवा धक्का

अल्जारी जोसेफच्या रुपाने वेस्ट इंडिजला सातवा धक्का बसला आहे. अश्विनने घेतली तिसरी विकेट

वेस्ट इंडिजला सहावा धक्का

वेस्ट इंडिजला सहावा धक्का बसला आहे. मोहम्मद सिराजने जेसन होल्डर याला तंबूत पाठवले

वेस्ट इंडिजची शंभरीपार मजल

वेस्ट इंडिजने पाच विकेटच्या मोबदल्यात 100 धावांचा पल्ला पार केलाय

वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत

रविंद्र जाडेजाने वेस्ट इंडिजला आणखी एक धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतलाय. जोशुओ डा सिल्वा याला जाडेजाने तंबूत पाठवले. वेस्ट इंडिज पाच बाद 76 धावा

पहिल्या सत्राचा खेळ संपला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या सत्राचा खेळ संपला. वेस्ट इंडिंजने 4 विकेटच्या मोबदल्यात 68 धावा केल्या आहेत. भारताकडून अश्विनने दोन तर शार्दूल ठाकूर आणि जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 

लॉर्डचा भेदक मारा, वेस्ट इंडिजला तिसरा धक्का

शार्दूल ठाकूर याने आपल्या पहिल्याच षटकात रेमन रीफर याला तंबूत पाठवले. वेस्ट इंडिजला तिसरा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिज 3 बाद 47 धावा

अश्विनचे वेस्ट इंडिजला दोन धक्के

आर. अश्विन याने वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत पाठवलेय. क्रैग ब्रॅथवेट 20 आणि चंद्रपॉल 12 धावांवर बाद झाले. वेस्ट इंडिज दोन बाद 38 धावा

वेस्ट इंडिजची संयमी सुरुवात

क्रैग ब्रॅथवेट आणि चंद्रपॉल यांनी संयमी सुरुवात केली आहे. 5 षटकानंतर वेस्ट इंडिजने बिनबाद 14 धावा केल्या आहेत. 

सामन्याला सुरुवात

क्रैग ब्रॅथवेट आणि चंद्रपॉल फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. तर गोलंदाजीसाठी सिराजने चेंडू घेतला आहे. 

वेस्ट इंडीज

: क्रैग ब्रॅथवेट (कर्णधार), चंद्रपॉल, रेमन रीफर, रहकीम कॉर्नवाल, जर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाजे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमार रोच,  जोमेल वारिकन

भारतीय संघ -

 : रोहित शर्मा (कर्णधार),यशस्वी जायसवाल,  शुभमन गिल,  विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

थोड्याच वेळात सामन्याला होणार सुरुवात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील पराभवाला मागे टाकत भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरत आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात भारतीय संघ करणार आहे. नव्या उमेदीने टीम इंडिया मैदानात उतरेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदा न्यूझीलंडकडून आणि यंदा ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता वेस्ट इंडिजविरोधात आपल्या पुढील अभियानाला टीम इंडिया सुरुवात करत आहे. यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेशकुमार यासारख्या युवा खेळाडूंना संधी देऊन संघ बांधणीस भारताने सुरुवात केली आहे. नवे खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये कशी कामगिरी करतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

IND vs WI संभावित प्लेइंग XI:

भारतीय संघ - : रोहित शर्मा (कर्णधार),यशस्वी जायसवाल,  शुभमन गिल,  विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन/केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज


वेस्ट इंडीज : क्रैग ब्रॅथवेट (कर्णधार), चंद्रपॉल, रेमन रीफर, रहकीम कॉर्नवाल, जर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाजे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, शैनन गेब्रियल

 कुठे पाहाल सामना? IND vs WI Broadcasting and Streaming Details

 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी, वनडे आणि टी20 सामने डीडी स्पोर्ट्सवर पाहता येतील.. फॅनकोड आणि जिओ सिनेमा या अॅपवरुन तुम्ही सामन्याचा आनंद घ्याल...एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळणार आहे. 

कुठे असेल सामना - 

 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना विंडसर पार्क रोसेउ, डोमिनिका येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

हेड टू हेड - 

 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 22 सामन्यात विजय मिळवलाय. तर 30 सामने वेस्ट इंडिजने जिंकलेत. 46 सामने अनिर्णित राहिलेत.  2002 पासून भारताने वेस्ट इंडिजविरोधात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही

यशस्वीच्या खडतर प्रयत्नाला यश, भारतीय संघात पदार्पणाची संधी

Yashasvi Jaiswal Profile And Career : मुंबई रणजी संघातील युवा खेळाडू यशस्वी जायस्वाल आज भारतीय कसोटी संघात पदार्पण करणार आहे. यशस्वीचा भारतीय संघात पोहचण्याचा मार्ग सोपा नव्हता. मूळचा उत्तरप्रदेशचा असणारा यशस्वी जायस्वाल क्रिकेटसाठी लहानपणीच मुंबईत आला होता.. त्यावेळी त्याच्या डोक्यावर छतही नव्हते.. खाण्याचेही वांदे असायचे... कठीण परिस्थितीवर मात करत यशस्वीने स्वत:ला सिद्ध केले. यशस्वी जायस्वाल याने मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये राजस्थानसाठी खोऱ्याने धावा काढल्या. धावांचा पाऊस पाडल्यानंतर यशस्वीला टीम इंडियाची दारे उघडली. यशस्वी जायस्वाल आज भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. 

पार्श्वभूमी

IND vs WI 1st Test: यशस्वी-रोहितची शतके, डोमिनिका कसोटीवर टीम इंडियाचे वर्चस्व; भारताकडे 162 धावांची आघाडी


India vs West Indies 1st Test Day 2 Highlights : डोमिनिका कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल दोघांनी शतके झळकावली आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने दोन बाद 312 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल 143 आणि विराट कोहली 36 धावांवर खेळत आहेत. भारताकडे 162 धावांची आघाडी आहे. यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांच्यामध्ये नाबाद 72 धावांची भागिदारी झाली आहे. डोमिनिका कसोटीवर भारताची भक्कम पकड झाली आहे. 
यशस्वी जायस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी 229 धावांची भागिदारी करत भारताला मजबूत सुरुवात करुन दिली. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांच्यापुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज फिके वाटत होते. ही जोडी फोडण्यासाठी वेस्ट इंडिजने नऊ गोलंदाजांचा वापर केला. शतक झळकावल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. रोहित शर्माने 221 चेंडूत 103 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये रोहित शर्माने दोन षटकार आणि 10 चौकार लगावले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिलही लगेच तंबूत परतला. शुभमन गिल याला फक्त सहा धावांचे योगदान देता आले. शुभमन गिल बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत यशस्वी जयस्वाल याला साथ दिली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वाल 350 चेंडूत 143  धावांवर खेळत आहे. तर विराट कोहली 96 चेंडूत 36 धावावर खेळत आहे. भारताकडे 162  धावांची आघाडी आहे. 



 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी तुफानी केली आहे. यशस्वी जायस्वाल याने पदार्पणातच शतक झळकावत आपली प्रतिभा दाखवून दिली. पहिल्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय संघाकडे सध्या 162 धावांची आघाडी झाली आहे.  भारतीय फलंदाजापुढे वेस्ट इंडिजचे गोलंदाज हतबल झाले. एकाही गोलंदाजाचा मारा प्रभावी वाटला नाही. 


 


अश्विन-जाडेजाची भेदक फिरकी, सामन्यावर भारताचे वर्चस्व, पहिल्या दिवशी काय झालं? 


India vs West Indies Dominica Test 1st Day: टीम इंडिया (Team India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात बुधवारी डोमिनिकामध्ये बुधवारी खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याला काल (बुधवारपासून) सुरुवात झाली. सामन्याचा पहिल्या दिवस पूर्णपणे टीम इंडियाच्या बाजूनं होता. वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावा करुन ऑल आऊट झाला. त्यानंतर भारतानं पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या. टीम इंडियासाठी रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हुकुमी एक्का ठरला. अश्विननं एक नाही, दोन नाही, तर तब्बल 5 विकेट्स घेत विंडिजच्या संघाचा धुव्वा उडवला. तर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रोहित आणि यशस्वीनंही आपली कमाल दाखवली. 


वेस्ट इंडिजचा संघ ऑल आऊट झाल्यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जशस्वी जायस्वाल (Yashasvi Jaiswal) यानं आपल्या धमाकेदार खेळीनं सुरुवात केली. महत्त्वाचं म्हणजे, यशस्वी जायस्वालचा हा डेब्यू सामना होता. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात यशस्वीनं 73 चेंडूंमध्ये नाबाद 40 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाचा स्टार कर्णधार रोहित शर्मानं 65 चेंडूंमध्ये नाबाद 30 धावांची खेळी केली. रोहित आणि यशस्वीनं भागीदारीमध्ये 80 धावांची खेळी केली. आज दुसऱ्या दिवशीही टीम इंडिया फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार असून रोहित आणि यशस्वी आजही आपल्या दमदार खेळीनं विंडिजला धूळ चारण्याची शक्यता आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजहून केवळ 70 धावांनी मागे आहे. 


अश्विनच्या फिरकीत अडकले वेस्ट इंडिजचे खेळाडू 
डोमिनिका टेस्टमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकत सर्वात आधी बँटिंग करण्याचा निर्णय घेतला. सर्वात आधी बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरलेला वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 150 धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडियाचा स्टार स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि जाडेजा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अगदी तुटून पडले. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 47 धावा एलिकनं केल्या. त्यानं 99 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एक षटकार लगावला. इंडिजचा कर्णधार ब्रेथवेट अवघ्या 20 धावा करुन माघारी परतला. तेजनारायण चंद्रपॉल 12 धावांवर आऊट झाला, तर कॉर्नवाल 19 धावांवर नाबाद राहिला. 


टीम इंडियासाठी अश्विननं 24.3 ओव्हर्समध्ये 60 धावा देत तब्बल 5 विकेट्स घेतले. त्यानं 6 मेडन ओव्हरही काढले. अश्विनसाठी हा डाव अत्यंत खास होता. त्याचं कारण म्हणजे, टीम इंडियाच्या स्टार स्पिनरनं वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवलं, त्यासोबतच त्यानं 700 आंतरराष्ट्रीय विकेट्स पूर्ण केले. रवींद्र जाडेजानं 14 ओव्हर्समध्ये 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यानं 7 मेडन ओव्हर्स काढले. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजनंही प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. 


 


India vs West Indies, Day 1 Live Score : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील पराभवाला मागे टाकत भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरत आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात भारतीय संघ करणार आहे. नव्या उमेदीने टीम इंडिया मैदानात उतरेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदा न्यूझीलंडकडून आणि यंदा ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता वेस्ट इंडिजविरोधात आपल्या पुढील अभियानाला टीम इंडिया सुरुवात करत आहे. यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेशकुमार यासारख्या युवा खेळाडूंना संधी देऊन संघ बांधणीस भारताने सुरुवात केली आहे. नवे खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये कशी कामगिरी करतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 


दुसरीकडे विश्वचषकातून गाशा गुंडाळल्यामुळे वेस्ट इंडिजवर टीकेची झोड उडाली आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ खेळत नाही, त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. त्यामुळे भारताविरोधात वेस्ट इंडिजचा संघ आक्रमकपणे उतरेल. क्रैग ब्रॅथवेटच्या नेतृत्वातील वेस्ट इंडिजचा संघ भारतीय संघाला आव्हान देणार आहे. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला पराभूत करणं, तितके सोपं नाही. कागदावर भारताचा संघ मजबूत वाटत असला तरी घरच्या खेळपट्टयावर विडिंजचा संघ विजय मिळवू शकतो. 


हेड टू हेड - 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 22 सामन्यात विजय मिळवलाय. तर 30 सामने वेस्ट इंडिजने जिंकलेत. 46 सामने अनिर्णित राहिलेत.  2002 पासून भारताने वेस्ट इंडिजविरोधात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. 



IND vs WI पहिल्या कसोटीत कोणत्या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल - 


शुभमन गिल, रविंद्र जाडेजा, विराट कोहली, क्रैग ब्रॅथवेट, चंद्रपॉल, केमर रोच या खेळाडूच्या कामगिरीकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष असेल.  केमर रोच आणि विराट कोहली यांच्यातील सामना पाहण्यासारखा असेल. त्याशिवाय क्रैग ब्रॅथवेट आणि मोहम्मद सिराज यांचाही सामना रंजक असेल. 


कुठे असेल सामना - 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना विंडसर पार्क रोसेउ, डोमिनिका येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 


 कुठे पाहाल सामना? IND vs WI Broadcasting and Streaming Details


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी, वनडे आणि टी20 सामने डीडी स्पोर्ट्सवर पाहता येतील.. फॅनकोड आणि जिओ सिनेमा या अॅपवरुन तुम्ही सामन्याचा आनंद घ्याल...एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळणार आहे. 


IND vs WI संभावित प्लेइंग XI:


भारतीय संघ - : रोहित शर्मा (कर्णधार),यशस्वी जायसवाल,  शुभमन गिल,  विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन/केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज


वेस्ट इंडीज : क्रैग ब्रॅथवेट (कर्णधार), चंद्रपॉल, रेमन रीफर, रहकीम कॉर्नवाल, जर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाजे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, शैनन गेब्रियल


भारताचा कसोटी संघ 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.


वेस्ट इंडिजचा कसोटी संघ - 


क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, तेजनारायण चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ डिसिल्वा, शेनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.