India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 LIVE: कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आशिया चषकाची फायनल सुरु आहे. मेगा फायनलमध्ये नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने पडला आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि श्रीलंका आठव्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये भिडणार आहेत. 


भारतीय संघात बदल -


भारतीय संघात काही खेळाडूंचे कमबॅक झालेय. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांचे कमबॅक झाले आहे. तर अक्षर पटेल याच्या जागेवर वॉशिंगटन सुंदर याला स्थान दिलेय. त्याशिवाय गोलंदाजीतही बदल करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह आणि सिराज यांचे कमबॅक झालेय.


श्रीलंका संघात एक बदल करण्यात आला आहे. महिश तिक्ष्णा दुखापतीमुळे फायनल सामन्याला मुकला आहे.  हेमन्था याला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेय. 


श्रीलंका संघाची प्लेइंग इलेव्हन : 


पथुम निसंका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चॅरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), डुनिथ वेल्लेलागे, दुशान हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना


भारतीय संघात कोण कोण ?


शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज


कोलंबोतील आजच्या सामन्यातील खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर ती फिरकीसाठी उपयुक्त ठरू शकते. खेळपट्टी नवीन आहे, पण त्यावर हलक्या भेगा आहेत. येथे धावसंख्या 300 धावांच्या पुढे जाऊ शकते. ही खेळपट्टी श्रीलंकेच्या खेळाडूंसाठी उपयुक्त ठरू शकते.