IND vs SA T20 Series, Virat Kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या अडचणी कमी व्हायच्या नाव घेत नाहीत. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीसाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलनंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी 20 मालिकेत विराट कोहली भारतीय संघाचा भाग नसेल. मागील काही दिवसांपासून विराट कोहली आऊट ऑफ फॉर्म आहे, त्यामुळे बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या एका सदस्याने याबाबत माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशात होणाऱ्या टी 20 मालिकेत आणि आयरलँड दौऱ्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचा भाग नसेल. विराट कोहली थेट इंग्लंडविरोधात इंग्लंडमध्ये खेळताना दिसेल.  

इनसाइड स्पोर्ट्ससोबत बोलताना निवड समितीचा सदस्य म्हणाला की,  " कोणताही खेळाडू खराब फॉर्ममध्ये असल्याचे पहिल्यांदा नाही. याआधी अनेक खेळाडू आऊट ऑफ फार्म राहिले आहेत. असा बॅडपॅच प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येतोच. आम्ही असेही युवा खेळाडूंना संधी देण्याचा विचार करत आहोत. काही सिनिअर खेळाडूंना या दोन्ही मालिकेत आराम देणार आहोत. विराट कोहलीलाही आराम दिला जाणार आहे. जर विराट कोहलीची खेळण्याची इच्छा असेल तर आम्ही विचार करु.  निवड समितीच्या बैठकीपूर्वी विराट कोहलीशी याबाबत चर्चा केली जाईल." 

IPL संपताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत टी-20 मालिका खेळणारभारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेचं वेळापत्रक 

क्रमांक

 

 

दिवस

तारीख

सामना

ठिकाण

1

गुरुवार

9 जून

1st T20I

दिल्ली

2

रविवार

12 जून

2nd T20I

कटक

3

मंगळवार

14 जून

3rd T20I

वायजाग

4

शुक्रवार

17 जून

4th T20I

राजकोट

5

रविवार

19 जून

5th T20I

बेंगलरु