Indian Cricket Team Tour Of South Africa: भारतीय संघ उद्यापासून (10 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरोधात मैदानात उतरणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. टी-20ची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे, तर केएल राहुल एकदिवसीय मालिकेची कमान सांभाळणार आहे. कसोटी संघाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. पाहूयात संपूर्ण वेळापत्रक आणि कोण कोणत्या संघात कोणते खेळाडू...
वेळापत्रक काय ?
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला T-20 सामना 10 डिसेंबरला डर्बनमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा टी-20 सामना 12 डिसेंबरला खेळवला जाईल. तिसरा T- 20 14 डिसेंबरला होणार आहे. 17 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होणार आहे. हा सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. यानंतर दुसरा सामना 19 डिसेंबरला तर तिसरा सामना 21 डिसेंबरला होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून तर दुसरा सामना 3 जानेवारीपासून होणार आहे.
दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टी20 स्क्वॉड
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.
दक्षिण अफ्रीका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वनडे स्क्वॉड
ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, दीपक चाहर.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा टेस्ट स्क्वॉड
रोहित शर्मा (Rohit Sharma) (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, विराट कोहली (Virat Kohali), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) , ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), ईशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी*, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.
टी-20 मालिकेत आफ्रिकेची गोलंदाजी कमकुवत राहू शकते
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आपला सर्वात महत्त्वाचा गोलंदाज कागिसो रबाडालाही विश्रांती दिली आहे. आता लुंगी एनगिडी बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाजी आक्रमण थोडे कमकुवत दिसेल. आता या संघातील वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जेराल्ड कोएत्झी, नांद्रे बर्जर, ओटनील बार्टमन आणि लिझार्ड विल्यम्स यांच्यावर असेल. या चार वेगवान गोलंदाजांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही.