IND vs SA, 3rd Test Live: तिसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला, आफ्रिकेला विजयासाठी 111 धावांची गरज

IND vs SA, Day 2 Live : मालिका 1-1 बरोबरीत आहे. निर्णायक केपटाऊन कसोटी सामना जिंकणारा संघ मालिकेवर नाव कोरणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jan 2022 03:23 PM
तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला असून भारताने आफ्रिकेचे दोन गडी बाद केले आहेत. पण सोबतच आफ्रिकेने 100 धावांचा टप्पा पार केल्याने त्यांना विजयासाठी केवळ 111 धावांचीच गरज आहे. तर भारताला 8 विकेट्सची

दक्षिण आफ्रिकेच्या 100 धावा पूर्ण

सलामीवीर मार्करम बाद झाल्यानंतर एल्गर आणि पीटरसन यांनी आफ्रिकेचा डाव सावरला आहे. आफ्रिकेने एक विकेट गमावत 100 धावा पूर्ण केल्या आहेत.

भारताची चांगली सुरुवात, आफ्रिकेचा सलामीवीर बाद

भारतीय गोलंदाद मोहम्मग शमीने आफ्रिकेच्या मार्करमला बाद केल्यामुळे 10 ओव्हरनंतर आफ्रिकेचा स्कोर 31 वर एक बाद असा आहे.

भारताकडे 211 धावांची आघाडी

भारताचा दुसरा डाव संपला असून भारताने पंतच्या शतकाच्या मदतीने 198 धावा केल्याअसून 211 धावांची आघाडी मिळवली आहे.

पंतचं धडाकेबाज शताक, अप्रतिम एकाकी झुंज

पंतने एकाकी झुंज देत अखेर शतक पूर्ण केलं आहे. भारताने 208 धावांची आघाडी घेतली आहे. 

मोहम्मद शमी बाद, भारत 189/9

भारताचा नववा गडी मोहम्मद शमीच्या रुपात बाद झाला आहे. सध्या पंतसोबत बुमराह क्रिजवर आहे.

भारताचे 8 गडी बाद, पंतचं शतक धोक्यात

भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंत एकहाती झुंज देत असून शतकापासून काही धावा दूर आहे. पण दुसऱ्या बाजूला फलंदाज टीक नसल्यामुळे त्याचं शतक धोक्यात आलं आहे. भारताने आठ विकेट गमावल्या आहेत

भारताला सहावा झटका, आश्विन बाद

पंतसोबत क्रिजवर टिकून खेळणारा आश्विनही सात धावा करुन बाद झाला आहे. लुंगीनेच त्याची विकेट घेतली आहे.

भारताला मोठा झटका, कोहली बाद

भारताचा कर्णधार विराट 29 धावा करुन बाद झाला आहे. लुंगीने त्याची विकेट घेतली आहे.

विराट कोहली आणि पंतने डाव सावरला, भारताकडे 143 धावांची आघाडी

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताकडे 143 धावांची आघाडी मिळाली आहे. पंत आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला आहे. पुजारा आणि रहाणे यांच्या झटपट विकेट पडल्यानंतर भारतीय संघाचा अडचणीत आला होता. पण पंत आणि विराटने भागिदारी करत भारताचा डाव सावरला. पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा 43 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा केल्या आहेत. 

ऋषभ पंतचे आठवे अर्धशतक

विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याने आपले आठवे अर्धशतक पूर्ण केलं आहे. 58 चेंडूत पंतने आपलं अर्धशतक साजरे केलं. पंतच्या दमदार खेळीच्या बळावर भारताकडे सध्या 143 धावांची आघाडी झाली आहे. 

पंत- कोहलीने डाव सावरला

विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरला आहे. ऋषभ पंत याने आपल्या स्टाइलने फटकेबाजी सुरु केली आहे. पंत आणि कोहली यांनी महत्वाची भागादारी करत भारताची आघाडी 100 च्या पुढे पोहचवली आहे. 

अजिंक्य रहाणे - चेतेश्वर पुजारा स्वस्तात माघारी परतले

तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेलाही कमाल करता आलेली नाही. अजिंक्य रहाणेही स्वस्तात माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. 

पार्श्वभूमी

IND Vs SA 3rd Score Live : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये (Cape Town) तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव करत दक्षिण आफ्रिका संघाने हिशोब चुकता केला. तीन सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणारा संघ मालिकेवर कब्जा करेल. कर्णधार विराट कोहलीने नामेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा डाव 210 धावांत संपुष्टात आला होता. दुसऱ्या दिवशी भारताचे सलामीवीर फलंदाजही माघारी परतले होते. आज तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे.... 


दरम्यान, भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय. भारतानं आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. भारताला दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.  भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजल्यापासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. हॉटस्टारवरही हा सामना लाइव्ह पाहता येणार आहे.
 
संघ-
भारताचा प्लेईंग इलेव्हन– केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव


दक्षिण आफ्रिकेचा प्लेईंग इलेव्हन– डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (विकेटकिपर), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.