Thiruvananthapuram T20Is Records : ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध (Ind vs Aus) सामन्यानंतर आता भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) तीन टी20 सामने खेळणार आहे. उद्यापासून अर्थात 28 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या टी20 मालिकेतीलल पहिला सामना केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) होणार आहे. दरम्यान तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय संघाला तीन वर्षापूर्वी मेोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर भारत अद्याप याठिकाणी सामना खेळला नसून आता होणाऱ्या सामन्यात भारताची कामगिरी कशी असेल याकडे फॅन्सचं लक्ष आहे.

तीन वर्षांपूर्वी भारत याठिकाणी वेस्ट इंडिजविरुद्ध सामना खेळला होता. 8 डिसेंबर 2019 रोजी हा सामना पार पडला होता. त्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. दरम्यान सामन्यात वेस्ट इंडीजने भारताला मोठ्या पराभवाने पराभूत केलं होतं. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 170 धावा केल्या. टीम इंडियासाठी शिवम दुबेने 30 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी केली. तर ऋषभ पंतने 22 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या.पण या दोघांशिवाय भारताचा दुसरा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. केएल राहुल (11), रोहित शर्मा (15) आणि विराट कोहली (19) हे दिग्गज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले.

भारताचा 8 विकेट्सने पराभव

171 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विंडीजच्या सलामीवीरांनीच दमदार सुरुवात केली. लेंडल सिमन्स (67) आणि एव्हिन लुईस (40) यांनी वेस्ट इंडिजला संयमी पण दमदार सुरुवात करून दिली. यानंतर उर्वरित काम शिमरॉन हेटमायर (23) आणि निकोलस पूरन (38) यांनी केलं. दोघांनी वेगवान खेळी खेळत वेस्ट इंडीजला 18.3 षटकांत लक्ष्य पूर्ण केले. विंडीज संघाने 8 गडी राखून विजय मिळवला.

भारत- दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका वेळापत्रक: 

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 28 सप्टेंबर 2022 तिरुवनंतपुरम 
दुसरा टी-20 सामना 2 नोव्हेंबर 2022 गुवाहाटी
तिसरा टी-20 सामना 4 ऑक्टोंबर 2022 इंदूर

भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 6 ऑक्टोंबर 2022 लखनौ
दुसरा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोंबर 2022 रांची 
तिसरा एकदिवसीय सामना 11 ऑक्टोंबर 2022 दिल्ली

हे देखील वाचा-