IND vs PAK : भारत-पाकिस्तानमध्ये सुपर लढत, कधी-कुठे पाहाल महामुकाबला? सर्व माहिती एका क्लिकवर

IND vs PAK Live : आशिया चषकातील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे.

Continues below advertisement

IND vs PAK Live : आशिया चषकातील सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आमनासामना होणार आहे. कोलंबोच्या मैदानात दोन्ही संघामध्ये पुन्हा एकदा लढत होणार आहे. 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेली लढत पावसामुळे रद्द झाली होती. आता रविवारच्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. पण चाहत्यांसाठी दिलासादायक वृत्त म्हणजे, सुपर 4 मधील भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यासाठी राखीव दिवस आहे. 

Continues below advertisement

कधी होणार IND vs PAK हायव्होलटेज सामना?
आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होलटेज सामना 10 सप्टेंबर रोजी रविवारी खेळवण्यात येणार आहे.  भारतीय वेळेनुसार, या महामुकाबल्याची सुरुवात दुपारी 3 वाजता होणार आहे.  तर दुपारी 2.30 वाजता नाणेफेक होणार आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुठे रंगणार सामना? 
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेतील कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

भारतात कधी पाहता येणार IND vs PAK हायव्होलटेज सामना?
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. 

लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.

पाऊस पुन्हा ठरणार महत्वाचा ?

Accuweather च्या वृत्तानुसार, रविवारी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता 75 टक्के इतकी आहे. आशिया चषकात दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द होणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत. रविवारी दुपारी कोलंबोमध्ये 99 टक्के ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी अडीच वाजता पावसाची शक्यता 77 टक्के असेल... तर सायंकाळी 80 टक्के पाऊस कोसळू शकतो. Accuweather च्या रिपोर्ट्सनुसार, दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार का ? अशी चर्चा रंगली आहे.  

आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.

राखीव खेळाडू : संजू सॅमसन

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ 
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola