Ind vs NZ First Test Match: न्यूझीलंडने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला आहे. वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाज किंवा अष्टपैलू म्हणून नाही तर सलामीवीर फलंदाज म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले आहे.


रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे अष्टपैलू आणि फिरकी गोलंदाजाच्या रूपात भारताकडे आधीच दोन महान खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत जर वॉशिंग्टन सुंदर गोलंदाज किंवा अष्टपैलू फिरकी गोलंदाज म्हणून खेळत असेल तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता फार कमी आहे. दरम्यान वॉशिंग्टन सुंदरने 2021 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. दुखापतीमुळे शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नाही, त्यामुळे सलामीवीर म्हणून वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 






रणजी ट्रॉफीमध्ये सलामीवीर म्हणून बजावलीय भूमिका-


रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात तामिळनाडूकडून खेळताना वॉशिंग्टन सुंदरने दिल्लीविरुद्ध 152 धावांचे शानदार शतक झळकावले. वॉशिंग्टन सुंदरला देशांतर्गत संघात सलामीला फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली आहे. वॉशिंग्टन सुंदरने सलामीला येऊन चांगली फलंदाजी देखील केली. यावेळी मी स्वत:ला टॉप ऑर्डरचा फलंदाज समजतो. मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गरजेच्या वेळी संघाला जे सर्वात जास्त आवश्यक आहे ते करेन, असं वॉशिंग्टन सुंदरने सांगितले. 


सामना कसा राहिला?


भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघ पहिल्या डावात फक्त 46 धावा करु शकला. तर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 402 धावा करत 356 धावांचा आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या या भक्कम आघाडीनंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात 462 धावा केल्या. यामध्ये सर्फराज खानने 150 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 99 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य देण्यात आले. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. 3 सामन्याच्या या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


संबंधित बातमी:


Womens T20 World Cup 2024: लढले, जिंकले, रडले...; न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या, दक्षिण अफ्रिकेचं पुन्हा स्वप्न भंगलं