IND vs NZ, T20 World Cup: न्यूझीलंड विरुद्ध 'करो या मरो'च्या सामन्यात भारताचा 8 विकेट्सने पराभव झाला आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर आज खेळण्यात आलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली.  भारताने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 110 धावा केल्या. या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने 8 विकेट्स राखून भारतावर विजय मिळवला आहे. 


AFG vs NAM Highlights: भारताचे टेन्शन वाढले, अफगाणिस्तानच्या विजयामुळे समीकरण बदलण्याची शक्यता


नाणेफक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताकडून ईशान किशन (16 बॉल 18 धावा), रोहित शर्मा 14 बॉल 14 धावा), केएल राहुल 16 बॉल 18 धावा), विराट कोहली (17 बॉल 9 धावा), ऋषभ पंत (19 बॉल 12 धावा), हार्दिक पांड्या (24 बॉल 23 धावा), रवींद्र जडेजा (19 बॉल 26), शार्दुल ठाकूर (3 बॉल 0 धाव) आणि मोहम्मद शमी शून्यावर नाबाद राहिला. ज्यामुळे भारताला केवळ 110 धावापर्यंत मजल मारता आली. न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्टने आक्रमक गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात 20 धावा देऊन 3 विकेट्स पटकावले. याशिवाय, फिरकीपटू ईश सोडीने दोन विकेट्स मिळवल्या. तर, टीम साऊथी आणि अॅडम मिल्ने यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली आहे. 


या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाकडून मार्टिन गुप्टिल (17 बॉल 20), डॅरिल मिशेल (35 बॉल 49 धावा), केन विल्यमसन नाबाद (31 बॉल 33 धावा) आणि डेव्हॉन कॉनवेने नाबाद 2 धावा केल्या. ज्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने 14.3 षटकातच भारतावर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे.


न्यूझीलंडविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताला विजय मिळवणे आवश्यक होता. मात्र, या पराभवामुळे भारताच्या उपांत्य फेरीत गाठण्याचा आशा धूसर झाल्या आहेत. भारताला या ट्वी-20 विश्वचषकात चांगली कामगिरी करता आली नाही. विश्वचषकात यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आला नव्हता. मात्र, या विश्वचषकात पाकिस्तानच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा मोडीत काढून नवा विक्रम रचला आहे. त्यानंतर आज न्यूझीलंडकडून मिळालेला पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले आहेत.