टी-20 विश्वचषकाच्या 28 सामन्यात भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघाने प्रथम गोलंदाजी (India vs New Zealand) करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबई आंतराष्ट्रीय मैदानात (Dubai International Cricket Stadium) आजचा सामना खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघाची (T20 World Cup 2021) सुरुवात अतिशय खराब झाली. दरम्यान, दोन्ही संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्कारावा लागला. आजचा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे. महत्वाचे म्हणजे, आजचा सामना गमवणाऱ्या संघाचा सेमीफायनलचा मार्ग आणखी खडतर होईल.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघानी पहिला सामना गमावला असला तरी भारताचा पहिल्या सामन्यात 10 विकेट्सने पराभव झाला होता. त्यामुळे नेट रनरेटच्या बाबतीत न्यूझीलंडची परिस्थिती भारतापेक्षा बरी आहे. भारताला हा केवळ जिंकून चालणार नाही तर, न्यूझीलंडच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागणार आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. न्यूझीलंडने 20 षटकांत 8 विकेट्स गमावून केवळ 134 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा गाठता आला नाही. या सामन्यात फिरकीपटू ईश सोधीने दोन, तर टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.
भारतीय संघ-
विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, इशान किशन, राहुल अश्विन, रविचंद्रन. चहर
न्यूझीलंडचा संघ-
केन विल्यमसन (कर्णधार), टिम सेफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट, काइल जेमिसन, अॅडम मिल्ने, टॉड अॅस्टल, मार्क चॅपमन
महत्वाचे म्हणजे, शारजाह किंवा दुबईतील प्रत्येक धावपट्टी प्रथम गोलंदाजी करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरली. आतापर्यंत झालेल्या 14 पैकी 12 सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ विजयी ठरला.