India vs New Zealand Final Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy Final 2025) आज अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. फॉर्मात परतलेला विराट कोहली (Virat Kohli) आणि 'डिपेंडेबल'श्रेयस अय्यरवर भारताची मदार राहणार आहे. तर न्यूझीलंडसाठी रचिन रवींद्र, केन विल्यम्सन आणि कर्णधार मिचेल सँटनर कळीचे ठरतील. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री अंतिम सामन्यात खेळतो की नाही याची उत्कंठा देखील लागली आहे. 




चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या अंतिम सामन्यात नाणेफेक महत्वाची असणार आहे. खेळपट्टीचे स्वरूप बघता आधी फलंदाजी घेणाऱ्या संघाला लाभ होऊ शकतो. मात्र भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत एकही सामन्यात नाणेफेक जिंकता आलेली नाही. परंतु भारताने मात्र सामने जिंकलेत. पण अंतिम सामना असल्याने नाणेफेक महत्वाची ठरणार आहे, त्यामुळे रोहित शर्माला थोडी नशीबाचीही साथ लागणार आहे. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे फिरकी गोलंदाज भेदक असल्याने मधल्या षटकांमध्ये उत्कृष्ट मारा करून सामन्यात चुरस आणू शकतात. 


अंतिम सामन्यात कशी असेल खेळपट्टी? (Pitch Report Dubai Ind vs NZ Match)


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ज्या खेळपट्टीवर खेळला गेला होता तीच खेळपट्टी भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यासाठी तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली असेल. फलंदाजांसाठी कठीण समस्येचा सामना करावा लागेल. फलंदाजांना येथे अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. खेळपट्टी संथ असेल, फिरकीपटूंना येथे चांगली मदत मिळेल. वेगवान गोलंदाजही चांगली कामगिरी करु शकतात. जरी येथे धावांचा पाठलाग करणे फार कठीण नसले तरी, जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 290-300 धावा केल्या तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला लक्ष्य गाठणे खूप कठीण होईल.


भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.


न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:


विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल ओरुक.


संबंधित बातमी:


India vs New Zealand Final Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज भारत-न्यूझीलंडची लढाई; हवामान विभागाने वर्तवला धक्कादायक अंदाज