कोलकाता : पाकिस्तानचा धुव्वा उडवत विश्वविजेत्या इंग्लंडने शेवटी कशीबशी लाज राखली आहे. शेवटच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानमध्येच होणाऱ्या चॅम्पियन्स ट्राॅफीला पात्र ठरला. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 50 षटकात 337 धावा केल्या. अशा परिस्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना केवळ 6.2 षटकांत म्हणजेच 38 चेंडूंत 338 धावा कराव्या लागणार होत्या. तरच त्यांचा संघ न्यूझीलंडला मागे टाकून उपांत्य फेरी गाठू शकणार होता. मात्र, विजय दूरच पण पाकिस्तानने सपशेल नांगी टाकल्याने दारुण पराभव स्वीकारावा लागला.






बेन स्टोक्स आणि जो रूटच्या अर्धशतकांच्या खेळीनंतर गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे इंग्लंडने विश्वचषकातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा 93 धावांनी पराभव केला. यासह इंग्लंडचा संघ 2025 च्या चॅम्पियन ट्रॉफीसाठीही पात्र ठरला. इंग्लंडने प्रथम खेळून 337 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 244 धावांवर गडगडला. पाकिस्तानकडून आघा सलमानने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर हरिस रौफने 35 धावा करून पराभवाचे अंतर कमी केले. इंग्लंडकडून डेव्हिड विलीने सर्वाधिक तीन बळी घेतले.






पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली. बाबर आझमच्या संघाला शून्यावर पहिला धक्का बसला. डेव्हिड विलीने अब्दुल्ला शफीकला बाद केले. त्याचवेळी फखर जमानने 9 चेंडूत 1 धावा करुन बाद झाला. फखर जमान बाद झाला तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या फक्त 10 होती. 10 धावांवर पाकिस्तानचे 2 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी निश्चितच संघर्ष दाखवला, मात्र दोन्ही खेळाडू जास्त वेळ क्रीझवर टिकू शकले नाहीत. बाबर आझम 45 चेंडूत 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर मोहम्मद रिझवानने 51 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. पाकिस्तानला 100 धावांवर चौथा धक्का बसला.


यानंतरही पाकिस्तानी फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतण्याची प्रक्रिया अव्याहत सुरूच होती. पाकिस्तानचे फलंदाज पॅव्हेलियनच्या जवळ जात राहिले. 126 धावांवर पाकिस्तानला पाचवा धक्का बसला. तर 150 धावांपर्यंत पाकिस्तानचे 7 खेळाडू पॅव्हेलियनकडे वळले होते. पाकिस्तानसाठी फक्त आगा सलमानला पन्नास धावांचा टप्पा ओलांडता आला. आघा सलमानने 45 चेंडूत 51 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. याशिवाय एकाही पाकिस्तानी फलंदाजाला अर्धशतकाचा टप्पा गाठता आला नाही.


मोहम्मद वसीम ज्युनियर आणि हरिस रौफचा संघर्ष...


पाकिस्तानचा नववा फलंदाज 191 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र यानंतर मोहम्मद वसीम ज्युनियर आणि हरिस रौफ यांनी सहजासहजी हार मानली नाही. दोन्ही खेळाडूंनी शेवटच्या विकेटसाठी 53 धावा जोडल्या. मात्र पाकिस्तानचा पराभव टाळता आला नाही. मोहम्मद वसीम ज्युनियरने 14 चेंडूत 16 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 1 षटकार मारला. हारिस रौफने 23 चेंडूत 35 धावांची खेळी केली. हरिस रौफने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 3 षटकार मारले.


इतर महत्वाच्या बातम्या