INDvsENG: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला इंग्लंडकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाचा डाव अवघ्या 124 धावांवर समाप्त झाला. या सामन्यात कर्णधार विराट कोहली शुन्यावर बाद झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28 व्या वेळी विराट शुन्यावर बाद झाला आहे. विराटच्या शुन्यावर बाद झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहेत.
उत्तरखंड पोलिसांनी ट्वीट करत म्हटलं की, "केवळ हेल्मेटचा वापर करणे पुरेसं नाही. पूर्ण लक्षपूर्वक गाडी चालवणे देखील महत्वाचे आहे. नाहीतर तुम्ही देखील कोहली प्रमाणे झिरोवर आऊट होऊ शकता."
कालच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली. श्रेयस अय्यर वगळता इतर भारतीय फलंदाज काही खास करू शकले नाहीत. जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड यांच्या गोलंदाजी पुढे टीम इंडिया मोठी मजल मारु शकली नाही. सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्याचं पाहायला मिळालं.
Ind vs Eng first T20 : इंग्लंडकडून पराभवाची परतफेड; 8 गडी राखत भारतावर मात
संघाचा डाव गडगडत असतानाच श्रेयस अय्यरनं त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याला यामध्ये साथ मिळाली ती म्हणजे खेळपट्टीवर दुसऱ्या टोकाला उभ्या असणाऱ्या हार्दीक पांड्याची. हार्दीक या सामन्यात भारताच्या धावसंख्येचा आकडा आणखी उंचावेल अशा क्रीडारसिकांच्या अपेक्षा होत्या. पण, त्यालाही प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आलं. फलंदाजांची चुकेली दिशा पाहता आणि रोहितच्या अनुपस्थितीची जाणीव झालेल्या संघानं 20 षटकांमध्ये 124 धावा केल्या. परिणामी इंग्लंडच्या संघाला भारतानं 125 धावाचं आव्हान दिलं.
भारताचं आव्हान स्वीकारत मैदानात आलेल्या इंग्लंडच्या संघानं गोलंदाजीच्या बळावर सहजपणे गाठता येईल अशा आव्हानाचा पाठलाग सुरु केला. संयमी खेळी करत इंग्लंडच्या फलंदाजांनी अतिशय सहजपणे अवघे 2 गडी गमावत भारतीय संघाचा पराभव केला. Malanनं दमदार षटकारासह भारताला पराभवाच्या छायेत लोटलं. सोळाव्या षटकातच इंग्लंडच्या संघाने हे लक्ष्य गाठलं. त्यामुळे आता उर्वरित चार सामन्यांमध्ये भारताच्या कामगिरीवरच साऱ्यांचं लक्ष असणार आहे. टी20 मालिकेची विजयी सुरुवात करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. आता ही आघाडी कायम ठेवत खेळात सातत्य राखण्यात त्यांना यश मिळतं का, हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.
युजवेंद्र चहलच्या नावे मोठा विक्रम
टीम इंडियाचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल या सामन्यात अत्यंत खराब गोलंदाजी केली. चहलने त्याच्या चार षटकांत 44 धावा देऊन एक विकेट घेतली. त्याने याा सामन्यात निराशजनक कामगिरी केली असली तरी त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंद झाला आहे. चहल आता टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट गोलंदाज ठरला आहे. या फॉरमॅटमध्ये चहलने आता 60 विकेट घेतल्या आहेत. त्याने जसप्रीत बुमराहला याबाबत मागे टाकले आहे. बुमराहच्या नावे टी-20 क्रिकेटमध्ये 59 विकेट आहेत.