IND vs ENG 2nd Test Live Score: लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र यजमान इंग्लंडने गाजवले. इंग्लंडने या सत्रात एकही विकेट न गमावता 97 धावा केल्या. असे असले तरी ते आता भारतापेक्षा 148 धावांनी मागे आहेत. जॉनी बेअरस्टो 51 धावांवर आणि जो रूट 89 धावांवर खेळत आहेत. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 108 धावांची भागीदारी झाली आहे. आज भारतीय गोलंदाज विकेटसाठी खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना त्यात यश आलं नाही. अजूनही खेळ सुरु आहे.
दोन वर्षानंतर फिफ्टी
जॉनी बेअरस्टोने यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक केले होते. त्यानंतर आज त्याच्या बॅटीतून कसोटीत अर्धशतक झळकावले गेले आहे. तो 91 चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने 51 धावांवर फलंदाजी करत आहे. दुसऱ्या टोकाला कर्णधार जो रूट 89 धावांवर आहे. इंग्लंडची धावसंख्या तीन विकेटवर 216 धावा झाली आहे.