India Tour Of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN Test Series) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 14 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्रामच्या (Chattogram) झुहूर अहमद चौधरी स्टेडियम (Zahur Ahmed Chowdhury Stadium) येथे खेळला जाणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलंय. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि बांगलादेश संघाचा कर्णधार शकीब अल हसन (Shakib Al Hasan) ट्रॉफीसोबत फोटो काढताना दिसले.
भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल आणि बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन यांनी संयुक्तपणे ट्रॉफी लॉन्च केली. दोन्ही कर्णधार ट्रॉफीसोबत फोटो काढताना दिसले. शाकिब अल हसन आणि केएल राहुल यांचा ट्रॉफीसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ट्वीट-
भारत-बांगलादेशमध्ये रंगणार कसोटी सामन्यांचा थरार
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.
भारताचा कसोटी संघ:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.
बांगलादेश संघ:
शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.
हे देखील वाचा-