Abhimanyu Easwaran Profile: भारत आणि बांगलादेश यांच्यादरम्यान दोन सामन्याची टी 20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. दुखापतीमुळे रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल संघाची धुरा सांभाळणार आहे. बीसीसीआयनं दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या जागी युवा अभिमन्यु ईश्वरन याला संधी दिली आहे. तो भारतीय संघासोबत जोडला गेलाय. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यु ईश्वरन याने दमदार कामगिरी केली आहे, त्यामुळेच त्याला टीम इंडियाचं तिकिट मिळालं आहे.

आतापर्यंत कोणत्या कोणत्या संघाकडून खेळलाय अभिमन्यु ईश्वरन?
अभिमन्यु ईश्वरन फलंदाजीशिवाय लेग ब्रेक गोलंदाजीही करतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अभिमन्यु ईश्वरन उत्तराखंड संघाचं प्रतिनिधित्व करतोय. त्याशइवाय अभिमन्यु ईश्वरन बंगाल, इंडिया, अंडर - 19, इंडिया ब्लू, इंडिया ए, इंडिया बी, रेस्ट ऑफ इंडिया, बोर्ड प्रेसीडेंट 11 या संघासाठी खेळला आहे. अभिमन्यु ईश्वरन याने प्रथम श्रेणी सामन्यात 78 सामन्यात पाच हजार 577 धावांचा पाऊस पाडलाय. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 51.5 इतका राहिलाय. तर सरासरी 54.3 इतकी राहिली आहे. 

कशी आहे कामगिरी?

अभिमन्यु ईश्वरन याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 78 सामने खेळले आहेत. या सामन्यात 82.2 च्या स्ट्राईक रेट आणि 46.2 च्या सरासरीनं तीन हजार 376 धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय अभिमन्यु ईश्वरन याने टी 20 क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावांचा पाऊस पाडलाय. अभिमन्यु ईश्वरन याने 28 टी 20 सामन्यात 121.5 च्या स्ट्राइक रेटने 728 धावांचा पाऊस पाडलाय. 

भारत-बांगलादेशमध्ये रंगणार कसोटी सामन्यांचा थरार
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.

भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण
पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबर 2022  झहूर अहमद चौधरी स्टेडियम
दुसरा कसोटी सामना 22-16 डिसेंबर 2022 शेर-ए-बांगला स्टेडियम