India Tour of Bangladesh: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. बांगलादेशमधील ढाकाच्या (Dhaka) नॅशनल स्टेडियममध्ये (National Stadium) हा सामना खेळला जातोय. या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराकडं (Cheteshwar Pujara) ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमनला (Don Bradman) मागं टाकण्याची संधी असेल.


सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 6 हजार 996 धावा केल्या. पुजारानं आतापर्यंत 6 हजार 984 धावा केल्या आहेत. पुजारानं 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बंगळुरू कसोटी सामन्यातून पदार्पण केलं होतं. आतापर्यंत त्यानं 97 कसोटी सामने खेळले असून यामध्ये त्याने 44.76 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत त्यानं 19 शतकं झळकावली आहेत.


पहिल्या कसोटीत पुजाराचं शतक
बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारानं त्याच्या कारकिर्दीतील 19वं कसोटी शतक झळकावलं. या शतकासह त्यानं  रॉस टेलर (न्यूझीलंड), गॉर्डन ग्रीनिज (वेस्ट इंडिज), क्लाइव्ह लॉईड (वेस्ट इंडिज) आणि माइक हसी (ऑस्ट्रेलिया) यांच्या कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. या सामन्याच्या पहिल्या डावात पुजाराचं अवघ्या 10 धावांनी शतक हुकलं.


सर्वाधिक कसोटी धावा करणारा आठवा भारतीय
भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्यांच्या यादीत चेतेश्वर पुजारा आठव्या क्रमांकावर आहे. त्याच्या पुढं सौरव गांगुली (7 हजार 212), विराट कोहली (8 हजार 94), वीरेंद्र सेहवाग (8 हजार 586), व्हीव्हीएस लक्ष्मण (8 हजार 781), सुनील गावस्कर (10 हजार 122), राहुल द्रविड (13 हजार 288) आणि सचिन तेंडुलकर (15 हजार 921) आहेत.


भारताचा कसोटी संघ:
केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.


बांगलादेश संघ:
शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.


हे देखील वाचा-