India vs Bangladesh 1st T20I : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये खेळवला जात आहे. पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जो भारतीय गोलंदाजीने योग्य ठरवला. बांगलादेश 127 धावांवर ऑलआऊट झाला.

  


बांगलादेशची सुरुवातीपासूनच खराब झाली आणि संघाकडून सर्वाधिक धावा मेहदी हसन मिराझने केल्या, त्याने 35 धावा केल्या. या सामन्यात मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांनी टीम इंडियासाठी पदार्पण केले. गोलंदाजीत भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग यांनी सर्वाधिक बळी घेतले, या दोघांनी पाहुण्या संघाच्या 3-3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. अर्शदीप सिंगने लिटन दास आणि नंतर परवेझ हुसेनला बाद करून बांगलादेशला सुरुवातीचे दोन धक्के दिले. परिस्थिती अशी होती की बांगलादेशचा निम्मा संघ 57 धावा होईपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. कर्णधार नजमुल शांतो बराच वेळ क्रीजवर होता, पण वॉशिंग्टन सुंदरने त्याला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले.


दरम्यान, मेहदी हसनने एक टोक रोखून ठेवले. तस्किन अहमद (12 धावा) सोबत त्याने केलेल्या 23 धावांच्या छोट्या पण महत्त्वाच्या भागीदारीच्या जोरावर बांगलादेश संघाने 100 धावांचा टप्पा ओलांडला. मेहदी हसन 35 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. अशाप्रकारे बांगलादेशचा संपूर्ण संघ 127 धावांवर ऑलआऊट झाला.


वरुण चक्रवर्तीचे जबरदस्त पुनरागमन


वरुण चक्रवर्ती 2021 नंतर भारतीय टी-20 संघात परतला आहे. परतल्यावर पहिल्या सामन्यात त्याने 4 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय अर्शदीप सिंगनेही गोलंदाजीत कहर केला, त्याने 3.5 षटकांत केवळ 14 धावा देत 3 बळी घेतले. हार्दिक पांड्या, मयंक यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.


हे ही वाचा -


IND vs BAN : स्पीड गन मयंक यादवची तुफानी एन्ट्री! आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील घेतली पहिली विकेट, कुणाची केली शिकार?


IND vs PAK T20WC : भारताने पाकिस्तानला लोळवले; पॉइंट टेबल मोठा बदल, टीम इंडिया कोणत्या स्थानी?