Ind vs Aus 4th Test Day-5 : 13 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये भारताचा कसोटी पराभव, ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय, मालिकेत घेतली 2-1 अशी आघाडी
Ind vs Aus 4th Test Day-5 Live : मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी खेळली जात आहे.
मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांनी पराभव केला आहे. विजयासाठी 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव 155 धावांवर आटोपला. 13 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा हा कसोटी पराभव आहे. यापूर्वी 2011 मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला होता. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांनंतर पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता पाचवी आणि शेवटची कसोटी 3 जानेवारीपासून सिडनीत खेळवली जाणार आहे.
भारताची सातवी विकेट 140 धावांवर पडली. यशस्वी जैस्वाल बाद झाल्याने टीम इंडियाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. तो 208 चेंडूत 84 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारताला पराभवाचा धोका आहे. टीम इंडियाला 130 वर सहावा धक्का बसला. पंत-जडेजानंतर मागील डावातील शतकवीर नितीश रेड्डी या सामन्यात एक धाव घेत नॅथन लायनचा बळी ठरला. सध्या यशस्वी जैस्वाल आणि वॉशिंग्टन सुंदर क्रीजवर आहेत.
एके काळी भारताची धावसंख्या 121 धावांत तीन विकेट्सवर होती आणि नऊ धावा करताना भारताने आणखी तीन विकेट गमावल्या. सध्या टीम इंडियाची धावसंख्या सहा विकेटवर 132 धावा आहे. 27 षटकांचा खेळ बाकी असून विजयासाठी 208 धावा करायच्या आहेत.
भारताला 127 धावांवर पाचवा धक्का बसला. दोन धावा करून रवींद्र जडेजा आऊट झाला. भारताची धावसंख्या पाच विकेटवर 130 धावा आहे. अजून 29 षटके खेळायची आहेत आणि विजयासाठी अजून 210धावांची गरज आहे.
भारताला 121 धावांवर चौथा धक्का बसला. ट्रॅव्हिस हेडने ऋषभ पंतला आऊट केले. त्याला 104 चेंडूत 30 धावा करता आल्या. पंतने यशस्वीसह दुसऱ्या सत्रात भारताची एकही विकेट पडू दिली नाही, मात्र तिसऱ्या सत्रात पहिली विकेट पडली आहे. पंतने यशस्वीसोबत 88 धावांची भागीदारी केली. सध्या भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 126 धावा असून विजयासाठी आणखी 214 धावांची गरज आहे. आज आणखी किमान 31 षटकांचा खेळ बाकी आहे.
पाचव्या दिवशी चहापानापर्यंत भारताने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून 112 धावा केल्या आहेत. दुसऱ्या सत्रात भारताने एकही विकेट गमावली नाही. पहिल्या सत्रातच तीनही धक्के बसले होते. रोहित शर्मा नऊ धावा करून बाद झाला तर विराट कोहली पाच धावा करून बाद झाला. केएल राहुल खातेही उघडू शकला नाही. आज किमान 38 षटकांचा खेळ बाकी असून टीम इंडियाला विजयासाठी आणखी 228 धावांची गरज आहे. यशस्वी जैस्वाल 63 धावांवर नाबाद असून ऋषभ पंत 28 धावांवर नाबाद आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 79 धावांची भागीदारी झाली आहे. या दोघांनी दुसऱ्या सत्रात सावध खेळ करत विकेट्स पडू दिल्या नाहीत.
यशस्वीने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 10वे अर्धशतक ठोकले. आतापर्यंत त्याने ऋषभ पंतसोबत 53 धावांची भागीदारी केली आहे. आज किमान 52 षटकांचा खेळ बाकी असून भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजून 254 धावांची गरज आहे.
बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 30 षटकात 3 गडी गमावून 50 धावा केल्या आहेत, यशस्वी जैस्वाल 27 धावा आणि ऋषभ पंत 4 धावांसह फलंदाजी करत आहे. टीम इंडियाला विजयासाठी अजून 290 धावा करायच्या आहेत.
पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरूच आहे. भारताने तीन गडी गमावून 33 धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजून 307 धावांची गरज आहे. अजून 65 षटके बाकी आहेत. ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहेत. रोहित नऊ धावा आणि कोहली पाच धावा करून बाद झाला. केएल राहुल खातेही उघडू शकला नाही.
पाचव्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 33 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा नऊ धावा करून बाद झाला तर विराट कोहली पाच धावा करून बाद झाला. तर केएल राहुल खातेही उघडू शकला नाही. कमिन्सने रोहित आणि राहुलला एकाच षटकात आऊट केले होते. त्याचवेळी कोहलीला मिचेल स्टार्कने आऊट केले.
भारताला 340 धावांचे लक्ष्य मिळाले होते, या प्रत्युत्तरात टीम इंडियावर आता पराभवाचा धोका आहे. सध्या यशस्वी जैस्वाल 14 धावांवर नाबाद आहे. आज 65.5 षटकांचा खेळ बाकी असून टीम इंडियाला विजयासाठी 307 धावांची गरज आहे.
25 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या डावातील 17 व्या षटकात रोहित शर्मा आणि केएल राहुलला आऊट केले. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कमिन्सने रोहितला आऊट केले तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कमिन्सने राहुलची शिकार केली. राहुलला खातेही उघडता आले नाही. भारतावर पुन्हा एकदा पराभवाचा धोका निर्माण झाला आहे. भारताला आता 315 धावांची गरज आहे आणि 73 षटके बाकी आहेत.
भारताला 25 धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माला पॅट कमिन्सने आऊट केले आहे. रोहितला नऊ धावा करता आल्या. या मालिकेत रोहित खराब फॉर्ममध्ये आहे.
पार्श्वभूमी
Australia vs India 4th Test Day-5 Live : मेलबर्न येथे खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. बॉक्सिंग डे कसोटी कांगारूंनी 184 धावांनी जिंकली. यासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता भारतासाठी WTC फायनलमध्ये जाणाचा मार्ग कठीण झाला आहे. या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताला 340 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया 155 रन्सवर ऑलआऊट झाली. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 84 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. नॅथन लायनलाही दोन यश मिळाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -