India Vs Australia 3rd Youth ODI : भारत अंडर-19 संघाने ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाचा 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 असा धुव्वा उडवला. एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाचा 167 धावांनी मोठ्या फरकाने पराभव केला आणि यजमान संघाला 3-0 ने क्लीन स्वीप केले. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताने शानदार कामगिरी करत एकदिवसीय मालिका जिंकली.

Continues below advertisement


आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी फ्लॉप (Ayush Mhatre Vaibhav Suryavanshi IND vs AUS 3rd Youth ODI)


तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी काही खास कामगिरी करू शकले नाही, परंतु मधल्या फळीतील फलंदाज वेदांत त्रिवेदी आणि राहुल कुमार यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली, त्यानंतर खिलन पटेल आणि उद्धव मोहन यांनी जबरदस्त गोलंदाजी करून  भारताला शानदार विजय मिळवून दिला. यापूर्वी, भारताने पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.






वेदांत-राहुलचे अर्धशतक (Vedant Trivedi-Rahul Kumar IND vs AUS 3rd Youth ODI) 


तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आणि 50 षटकांत भारताने 9 गडी गमावून 280 धावा केल्या. भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी केवळ 16 धावांवर बाद झाला, तर कर्णधार आयुष म्हात्रे 4 धावांवर माघारी परतला. विहान मल्होत्राने 40 धावांची खेळी केली. त्यानंतर मधल्या फळीत वेदांत त्रिवेदीने 86 आणि राहुल कुमारने 62 धावांची खेळी केली, ज्यामुळे भारताने ही धावसंख्या उभारली. याशिवाय हरवंश पंघालियाने (23) आणि खिलान पटेलने नाबाद 20 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियासाठी केसी बार्टनने सर्वाधिक 3 बळी घेतले.


खिलान-उद्धवची भेदक गोलंदाजी


प्रत्युत्तर 280 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकूच शकले नाहीत. ऑस्ट्रेलिया संघ फक्त 28.3 षटकांत 113 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून टॉम होगानने सर्वाधिक 28 धावा केल्या पण संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकला नाही. खिलान पटेलने भेदक मारा करत 7.3 षटकांत 26 धावांत 4 बळी घेतले. उद्धव मोहनने 5 षटकांत 26 धावांत 3 गडी बाद केले, तर कनिष्क चौहानने 2 बळी घेतले. या विजयासह भारताने मालिका 3-0 ने जिंकत ऑस्ट्रेलियाला धूळ चारली.


हे ही वाचा -



India vs Pakistan Final Asia Cup 2025 : नको ते कृत्य करून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी घेतलं धोनी अन् कोहलीचं नाव, ICCच्या सुनावणीत नेमकं घडलं काय?