India vs Australia: पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला भारतीय संघ उद्या (2 डिसेंबर) रोजी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात 66 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी पराभव केला आहे.
हे वर्ष विराट कोहलीच्या भारतीय संघासाठी चांगल ठरलं नाही. या वर्षीच्या सुरुवातीला न्युझीलंडविरोधात खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताला 3-0 असा पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ऑस्ट्रेलियाविरोधात सलग दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
गोलंदाजांनी केली निराशा
टीम इंडिया या दौऱ्यावर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव या सारख्या प्रमुख गोलंदाजांच्या फौजेसह गेली आहे. परंतु भारतीय संघाला भुवनेश्वर कुमारची उणीव जाणवतेय. पॉपर प्लेमध्ये विकेट पटकवण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरल्याचं चित्र आहे. गेल्या 14 एकदिवसीय सामन्यात केवळ पाच सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्यात यशस्वी ठरले आहेत. तिसऱ्या गोलंदाजाच्या स्वरुपात संघात सामील झालेल्या नवदीप सैनी पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यासाठी युवा खेळाडू टी. नटराजनला संधी द्यायला हवी. टी. नटराजन आयपीएलच्या 16 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत आणि त्याने सर्वात जास्त यॉर्करचा मारा केला आहे. त्याला आज संधी मिळाली तर डेथ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवर अंकुश बसू शकतो.
रोहित शर्माची उणीव
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या सामन्यात 308 तर दुसऱ्या सामन्यात 338 धावा केल्या. भारतीय संघ दोन्ही सामन्यात विजय प्राप्त करु शकला नाही. त्यामुळे संघाला रोहित शर्माची उणीव भासत असल्याचं चित्र पहायला मिळतंय. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ओपनिंगला आलेल्या मयंक अग्रवाल याने अनुक्रमे 22 आणि 28 धावा केल्या परंतु धवन सोबत त्याला चांगली सलामी देण्यात अपयश आलं.
चहलच्या जागी कुलदीपला स्थान देण्याची गरज
लेग स्पिनर युजवेंद्र चहल ऑस्ट्रेलियाविरोधात दोन्ही सामन्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 89 धावा दिलेल्या चहलने दुसऱ्या सामन्यात 71 धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चहलच्या गोलंदाजीचा सामना करण्यात कोणतीही अडचण येत नाही. या परिस्थितीत विराट कोहलीनं चाइनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला संधी देणं आवश्यक आहे. 60 सामन्यात 104 विकेट घेणाऱ्या कुलदीपने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 22 विकेट घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs AUS | कर्णधार म्हणून विराट कोहलीने घेतलेल्या निर्णयांवर गौतम गंभीरचा निशाणा; म्हणाला...
- Ind vs Aus | 'आमचा एकतर्फी पराभव झाला'; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर विराट कोहलीचं वक्तव्य