IND vs AUS, 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सध्याच्या स्थितीत कसोटी मालिकेत भारत 1-0 ने पुढे आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूं संघाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. ज्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. आता दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करतानाही जाडेजा गोलंदाजीत कमाल कामगिरी करत असून सामन्यातील पहिला विकेट घेताच त्यानं इतिहास रचला आहे.


रवींद्र जाडेजाने सामन्यातील पहिली विकेट घेताच 250 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या असून याआधाची त्याने 2500 धावांचा टप्पाही ओलांडल्याने इतक्या वेगाने अशी अप्रतिम अष्टपैलू खेळी करणारा तो पहिला भारतीय तर जगातील दुसराच क्रिकेटर ठरला आहे. या कामगिरीनंतर सर्वत्र त्याचं कौतुक होत असून बीसीसीआय़नंही खास पोस्ट करत त्याचं अभिनंदन केलं आहे.






India vs Australia 2nd Test Day 1: सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय खेळाडू


 भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळे आपल्या कसोटी कारकिर्दीत 619 विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता. त्याच्याशिवाय आर अश्विन 460 (बातमी लिहिपर्यंत), कपिल देव 434, हरभजन सिंग 417, इशांत शर्मा 311, झहीर खान 311, बिशन सिंग बेदी 266 आणि रवींद्र जाडेजाने 252 (बातमी लिहिपर्यंत) विकेट घेतल्या आहेत.


India vs Australia 2nd Test Day 1: जाडेजाची कसोटी कारकिर्द थोडक्यात


रवींद्र जाडेजाने 2012 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात कसोटी पदार्पण केलं होते. गेल्या 10 वर्षांपासून तो टीम इंडियाचा भाग आहे. जाडेजाने आतापर्यंत 61 कसोटी सामने खेळले आहेत. या 61 सामन्यांमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी करताना 2 हजार 593 धावा करण्यासोबतच 252 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 3 शतकं आणि 18 अर्धशतकं आहेत. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये नाबाद 175 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे, गोलंदाजीचा विचार केला तर त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 48 धावांत 7 बळी मिळवणे ही आहे.


हे देखील वाचा-