India vs Australia Probable 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आज दुसरा टी20 सामना पार पडणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला 209 धावांचं लक्ष्य देऊनही पराभव पत्करावा लागल्यामुळे आज भारतीय संघात बदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यात क्रिकबजच्या रिपोर्टनुसार आजच्या सामन्यात भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघात पुनरागमन करणार आहे, तो उमेश यादवच्या (Umesh Yadav) जागी संघात येईल. 


पहिल्या टी20 सामन्यात मैदानात उतरलेल्या उमेश यादवने तब्बल 43 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला. यावेळी त्याने दोन षटकात 27 रन दिले. त्याने स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेल असे महत्त्वाचे विकेट्स घेतले खरे पण त्याने बऱ्याच धावा देखील दिल्या. दुसरीके हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 49 तर भुवनेश्वर कुमारने 4 ओव्हरमध्ये 52 रन दिले. अशामध्ये भारतीय संघाचा मुख्य गोलंदाज बुमराहची कमतरता सर्वांनाच जाणवली. ज्यामुळे दुसऱ्या टी20 मध्ये बुमराह नक्कीच संघात येऊ शकतो.


कशी असू शकते अंतिम 11?


संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह. 



संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ - आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिंस, जोस हेजलवुड, सीन एबॉट.



सामन्यावर पावसाचं सावट




भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना सायंकाळी होणार असून याच दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाचा हा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने व्यक्त केला आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा क्षेत्र छत्तीसगडवर केंद्रीत आहे. 23 सप्टेंबरच्या सुमारास कमी दाबाचे क्षेत्र पूर्व मध्यप्रदेशावर केंद्रित राहील. मात्र त्याचा जोर कमी झालेला असेल असे अंदाज हवामान विभागाचे नागपूर येथील प्रादेशिक केंद्राचे संचालक मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केले आहे. 


महत्वाच्या बातम्या :