IND vs ZIM 2022 Squad: अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं झिम्बाब्वेविरुद्ध मंगळवारपासून खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेत वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) जागी अष्टपैलू शाहबाज अहमदची (Shahbaz Ahmed) निवड केलीय. बीसीसीयनं (BCCI) ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिलीय. खांद्याच्या दुखापतीमुळं वॉशिंग्टन सुंदरला झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलंय.
वॉशिंग्टन सुंदरला लँकेशायरकडून खेळताना गेल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये झालेल्या रॉयल लंडन वन डे चषकादरम्यान सुंदरच्या खांद्याला दुखापत झाली. ज्यामुळं झिम्बाब्वे दौऱ्यात त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्याच्याजागी इंडिया ए साठी खेळलेल्या शाहबाज अहमदला संघात स्थान देण्यात आलंय.
बीसीसीआयचं ट्वीट-
एक वर्षापासून वॉशिंग्टन सुंदरची दुखापतींशी झुंज
वॉशिंग्टन सुंदरला मागील काही महिन्यांपासून दुखापतींच्या समस्यांना सामारे जावा लागलं आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी वॉशिंग्टन सुंदरच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळं तो -पाच महिने संघाबाहेर होता.त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं पुनरागमन केले. तसेच जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड झाली. परंतु, यापूर्वीच त्याला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यानं पुन्हा भारतीय संघात कमबॅक केलं. पण, हाताच्या दुखापतीमुळं त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडावं लागलं होतं. दरम्यान, बोटाच्या दुखापतीमुळं त्याला आयपीएल पंधराव्या हंगामातील काही सामन्यांना मुकावं लागलं होतं. आयपीएलनंतर त्यानं इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. जिथं त्यानं चांगली कामगिरी केली. परंतु, खांद्याच्या दुखापतीनं त्याच्या कारकिर्दीत पुन्हा व्यत्यय आणलाय.
झिम्बाब्वे दौऱ्यातील भारताचा संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाज अहमद.
सहा वर्षानंतर भारताचा झिम्बाब्वे दौरा
दरम्यान, तब्बल सहावर्षानंतर भारतीय संघ झिम्बॉवेचा दौरा करणार आहे. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2016 मध्ये भारतानं झिम्बॉवे दौरा केला होता. त्यावेळी भारतानं झिम्बॉवेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती.
हे देखील वाचा-