Brisbane Olympics 2032: क्रिकेट चाहत्यांच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर आलीय. दरम्यान, 2028 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा (Cricket) समावेश केला जाण्याची शक्यता आहे. परंतु, हे शक्य नसल्यास ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये (Brisbane Olympics) क्रिकेटचा समावेश करण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियानं (Cricket Australia) तयारी सुरु केलीय. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या आगामी योजनांबद्दल सांगितलं. त्यावेळी क्रिकेटला ऑलिम्पिक खेळांचा भाग बनवणे आमचं लक्ष्य असेल, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलं होतं. 


मिळालेल्या महितीनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं क्रिकेटसह 8 खेळांची यादी तयारी केली आहे. ज्यांचा लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये समावेश केला जाऊ शकतो.त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या महिन्याच्या अखेरीस आयोजकांसमोर आपलं मत मांडणार आहे. ऑलिम्पिकचे आयोजन करणारे शहर कोणत्याही नव्या खेळांचा समावेश करू शकतात. परंतु, यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची परवानगी आवश्यक असते.


1900 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश
क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये फक्त एकदाच समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, केस पॅरिसमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेतून क्रिकेटला वगळण्यात आलं होतं. महत्वाचं म्हणजे, क्रिकेटचं ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग करण्यात यावा, अशी अनेकांची इच्छा आहे. क्रिकेट ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश केल्यास, क्रिकेट चाहत्यांसाठी यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नसेल.


बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय महिलांनी रौप्यपदक जिंकलं
बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत दमदारी कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत भारतानं रौप्यपदक जिंकून बर्मिंगहॅम येथे भारताचा तिरंगा फडकावला. बर्मिंगहॅम क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाकडं सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात होतं. परंतु, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवामुळं भारताला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारताचा 9 धावांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरनं एकाकी झुंज दिली. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात ती अपयशी ठरली. 


हे देखील वाचा-