ENG vs IND: बॅर्मिंगहॅम कसोटी सामना खेळल्यानंतर भारतीय संघ इग्लंडशी तीन सामन्यांची टी-20 आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान, टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची येत्या 48 तासांत घोषणा होण्याची शक्यता आहे. भारताचे दोन संघ वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा 'अ' संघ इग्लंड दौऱ्यावर आहे. तर,  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारताचा 'ब' संघ आयर्लंड दौऱ्यावर आहेत. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत कोणकोणत्या खेळाडूंना संधी मिळते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय पुढील 48 तासांत एकदिवसीय आणि टी-20 संघाची घोषणा करू शकते. भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं तो कसोटी खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय रोहितवरील ताण कमी करण्यासाठी बीसीसीआय टी-20 ची धुरा दुसऱ्या खेळाडूकडं सोपवू शकते.

इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 7 जुलै एजेस बाउल
दुसरा टी-20 सामना 9 जुलै एजबॅस्टन
तिसरा टी-20 सामना 10 जुलै ट्रेंट ब्रिज

इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक- 

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 12 जुलै ओव्हल 
दुसरा एकदिवसीय सामना 14 जुलै लॉर्ड्स
तिसरा एकदिवसीय सामना 17 जुलै मँचेस्टर 

 

हे देखील वाचा-