PAK vs ENG : इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान (ENG vs PAK) असा टी20 सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) पार पडला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ 6 विकेट्सनी पराभूत झाला. पण सामन्यात पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) एक शानदार अर्धशतक ठोकत 68 धावा केल्या. यासोबत रिझवानने टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या असून सोबतच विराटचा एक रेकॉर्डही त्याने तोडला आहे. रिझवानने कोहलीपेक्षा अधिक वेगाने 2000 टी20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. 


आयसीसी टी20 रँकिंगमध्ये पहिल्या नंबरवर असणाऱ्या मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.  रिझवानने आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांच्या 52 डावांमध्ये 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. बाबरनेही 52 डावांतच ही कामगिरी केल्याने दोघेही सर्वाधिक वेगाने 2000 धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचले आहेत. दुसरीकडे विराट कोहलीने मात्र 56 आंतरराष्ट्रीय टी20 डावांत 2000 रन पूर्ण केले आहेत. पण बाबरने कोहलीला मागं टाकलं असून आता रिझवाननेही कोहलीला मागं टाकत बाबरसोबत मिळून अव्वलस्थान मिळवलं आहे.


राहुलनंही पार केला 2000 धावांचा टप्पा
 
मंगळवारीच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना देखील खेळवण्यात आला. या सामन्यात भारत 4 विकेट्सनी पराभूत झाला. पण अर्धशतक झळकावणाऱ्या केएल राहुलने देखील टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. राहुलने यासाठी 58 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून तो सर्वाधिक वेगाने 2000 धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानी आहे.  


भारत पाकिस्तान दोघेही पराभूत


भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारत 4 विकेट्सनी पराभूत झाला. सामन्यात नाणेफेक जिंकत कांगारुनी प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर भारताने केएल राहुल, हार्दीक यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 209 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाला दिले. पण ऑस्ट्रेलियानेही सुरुवातीपासून कमाल फलंदाजी केली. कॅमरुन ग्रीनचं धडाकेबाज अर्धशतक आणि वेड-स्मिथच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा संघ 4 विकेट्सनी सामना जिंकला. दुसरीकडे इंग्लंड पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 159 धावांचे आव्हान इंग्लंडला दिले जे त्यांनी 19.4 षटकात 6 गडी राखून पूर्ण करत सामना जिंकला.


हे देखील वाचा-