India Squad For Asia Cup 2025: आशिया कप 2025 साठी भारतीय संघ जाहीर (India Squad For Asia Cup 2025) करण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर झाला. निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान न देऊन पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. शुभमन गिल टी-20 संघात परतला आहे, परंतु श्रेयस अय्यरला आशिया कपसाठी संघात स्थान न दिल्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर टीका केली आहे. याचदरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत यांनी भारताच्या संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अक्षर पटेलला उपकर्णधारपदावरून काढून टाकणे आणि हर्षित राणा, रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांना संघात समाविष्ट करण्यावरही श्रीकांत यांनी टीका केली आहे. तसेच आशिया कपसाठी निवडलेल्या संघाने आपण आशिया चषक जिंकू, पण टी-20 विश्वचषक अजिबात जिंकू शकत नाही, असं श्रीकांत यांनी सांगितले. आयपीएल हा निवडीचा मुख्य आधार मानला जातो, परंतु असे दिसते की निवडकर्त्यांनी खेळाडूंच्या त्यापूर्वीच्या कामगिरीला जास्त महत्त्व दिले आहे, अशी टीका श्रीकांत यांनी केली. 

श्रेयस अय्यरला पुन्हा दुर्लक्षित केले-

देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करूनही, श्रेयस अय्यरला आशिया कप 2025 संघातून दुर्लक्षित करण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये अय्यर भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. यासोबतच, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही अय्यरने चांगली कामगिरी केली होती.

आशिया कपसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - 

शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

आशिया कप 2025 साठी भारतीय संघ-

फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.अष्टपैलू : हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल.यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.गोलंदाज : जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.

आशिया कपमधील भारताचे वेळापत्रक

10 सप्टेंबर - विरुद्ध यूएई (दुबई)14 सप्टेंबर - विरुद्ध पाकिस्तान (दुबई)19 सप्टेंबर - विरुद्ध ओमान (अबू धाबी)

संबंधित बातमी:

Shubman Gill : शुभमन गिल उपकर्णधार, BCCI ने एकाच दगडात किती पक्षी मारले, कुणाकुणाचे गेम झाले?

Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला न निवडण्याचं कारण सांगा, अभिषेक नायरचा BCCI ला थेट सवाल, तुफान फॉर्ममधील खेळाडूला बाहेर ठेवल्याने आश्चर्य