ICC ODI World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाच्या पराभवामुळे या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या वनडे विश्वचषकापूर्वी संघाच्या तयारीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या मालिकेत जिथे कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याने भारतीय संघासाठी आपल्या कामगिरीने प्रभावित केले, तिथे केएल राहुल काहीस हिट ठरला. पण संघातील इतर खेळाडूंच्या कामगिरीने सर्वांची निराशा केली. विश्वचषकापूर्वी या मालिकेत ज्या त्रुटी समोर आल्या, त्यामध्ये लवकरात लवकर संघाला सुधारणा करावी लागणार आहे.


1- परिस्थितीनुसार खेळात बदल


भारतात होणार्‍या विश्वचषक स्पर्धेचे सामने अनेक शहरांमध्ये खेळवले जातील, अशा परिस्थितीत संघाला सर्वत्र वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे, ज्यासाठी त्यांना आधीच तयारी करावी लागेल. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान मुंबईत वेगळी परिस्थिती पाहायला मिळत असताना, चेन्नईत संघाला कांगारू फिरकी गोलंदाजांसमोर संघर्ष करावा लागला. हे लक्षात घेऊन संघाला विश्वचषकावेळी सुधारणा कराव्या लागतील.


2 - फिरकी गोलंदाजीत अधिक विविधता हवी


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघ कुलदीप यादव व्यतिरिक्त 2 डावखुरा फिरकी गोलंदाजांसह खेळताना दिसला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले की, कुलदीप यादव हा संघाचा पहिला-पसंतीचा फिरकी गोलंदाज असणार आहे, इतर दोन डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांच्या जागी संघाने प्लेईंग इलेव्हनमध्ये ऑफ-स्पिनरचाही समावेश केला आहे. कदाचित, ज्यामध्ये संघाकडे वॉशिंग्टन सुंदरचा पर्याय असेल, जो फलंदाजीतही खूप उपयुक्त ठरू शकेल.


3- सूर्यकुमार यादवच्या फॉर्ममुळे चिंता वाढली


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कोणत्याही एका फलंदाजाच्या फॉर्मची सर्वाधिक चर्चा झाली, तर तिन्ही एकदिवसीय मालिकेतील आपल्या डावातील पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतणारा सूर्यकुमार यादव होता. मधल्या फळीत श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबाबत काहीही निश्चित नसल्यामुळे सूर्यकुमारच्या या फॉर्ममुळे संघ व्यवस्थापनासाठी निश्चितच मोठी समस्या निर्माण झाली आहे.


4- हार्दिक आणि जाडेजा यांनाही सुधारणा करणं आवश्यक


तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात एकेकाळी भारतीय संघाची स्थिती चांगलीच भक्कम दिसत होती, पण अचानक महत्त्वाच्या विकेट पडल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. यानंतर हार्दिक आणि जाडेजाने डावाला लक्ष्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांनाही त्यात यश मिळू शकले नाही. अशा स्थितीत हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांना मॅच फिनिशरची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडण्यावर भर द्यावा लागणार आहे.


5– आयपीएलचा ताण घेता कामा नये


वर्षाच्या अखेरीस होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी भारतीय खेळाडूंना स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांच्या कामाच्या भाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल दरम्यान यासाठी फ्रँचायझींना मार्गदर्शक तत्त्वे देखील देण्यात आली आहेत, परंतु कर्णधार रोहितने निश्चितपणे आपल्या निवेदनात सांगितले की ते किती पाळले जाईल याबद्दल मी जास्त सांगू शकत नाही आणि शेवटी बरेच काही खेळाडूवर अवलंबून असते. 


हे देखील वाचा-