IND vs PAK, T20 WC 2021 : दुबई येथे झालेल्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभावला सामोरं जावं लागलं. पाकिस्तान संघानं भारतीय संघाचा दहा विकेटनं पराभव केला. नाणेफेकीपासूनच सर्व काही भारतीय संघाच्या विरोधात गेलं. पहिल्या चेंडूपासून पाकिस्तान संघानं मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम ठेवली. विश्वचषकात पाकिस्तानकडून पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव झाला. नाणेफेक गमावलेल्या भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 151 धावा करता आल्या. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला 17व्या षटकात पार केलं. भारतीय संघाच्या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. आगामी सामन्यात भारतीय संघ या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल. पाहूयात पाकिस्तानविरोधात भारतीय संघाच्या पराभवाची कारण काय असू शकतात...


नाणेफेक -
दोन्ही संघातील विजयाचं मुख्य कारण नाणेफेक ठरलं आहे. दुबईच्या मैदानावर दव पडत असल्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरला. नाणेफेकीचा कौल भारताच्या विरोधात गेला अन् अर्धा सामना  तितेच फिरला. पाकिस्तान संघाने आपेक्षेप्रमाणे भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिल्या सहा षटकांत भारताचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाले. 


फलंदाजी -
भारतीय संघाची अपयशी फलंदाजी पाकिस्तानविरोधातील पराभवाचं कारण असू शकतं. मैदानावर दव पडणार असल्यामुळे भारतीय फलंदाजांकडून चांगल्या फलंदाजीची आपेक्षा होती. मात्र, विराट आणि पंत यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल स्वस्तात माघारी परतले. सुर्यकुमार यादवने जम बसल्यानंतर चुकीचा फटका मारत आपली विकेट फेकली. हार्दिक-जाडेजा यांनाही आपला प्रभाव पाडता आला नाही.  


हार्दिक-जाडेजा  - 
संघाच्या विकेट पडत असताना कर्णधार विराट कोहलीनं एक बाजू लावून धरली होती. अखेरच्या चार षटकांत मोठ्या फटक्यांची गरज होती. मात्र, जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांना आपल्या लौकिकास फलंदाजी करण्यास अपयश आलं. मोक्याच्या क्षणी विराट कोहलीही बाद झाला. परिणामी भारतीय संघाला फिनिशींग टच मिळाला नाही. 25 ते 30 धावांचा फरक पडला.


बाबर-रिझवान-
भारतीय संघानं दिलेल्या 152 धावांच्या आवाहानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी संयमाने फलंदाजी केली. अखेरपर्यंत त्यांनी एकहाती सामना घेऊन गेले. प्रत्येक फटका खेळताना संयमाचं दर्शवन घडवलं. पहिल्या चेंडूपासून भारतीय गोलंदाजांवर या जोडीनं वर्चस्व गाजवलं. 


गोलंदाजी -
विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीचं बिंग फुटलं. एकाही गोलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. 152 धावा वाचवताना एकाही गोलंदाजा एकाही फलंदाजाला बाद करता आलं नाही. बुमराह, शामी, भुवनेश्वर, जाडेजा आणि वरुण चक्रवर्ती सर्व गोलंदाज अपयशी ठरले. सहाव्या गोलंदाजाची उणीव भासली. हार्दिक पांड्या गोलंदाजी करु शकत नसल्यामुळे भारतीय संघाचं संतुलन बिघडलं आहे.  तसेच अनुभवी अश्वनला संघात स्थान द्यायला हवं होतं का? असा प्रश्नही उपस्थित झालाय.