Women U19 Asia Cup 2024 Ind vs Ban : 2024 मध्ये अंडर-19 महिला आशिया कपची पहिली आवृत्ती खेळली गेली. ज्यामध्ये भारतीय महिला संघाने प्रथमच विजेतेपद पटकावले आहे. भारताने अंतिम फेरीत बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. बांगलादेशची कर्णधार सुमैया अख्तरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संपूर्ण भारतीय संघ केवळ 117 धावांवर आटोपला. भारताकडून गोंगडी त्रिशाने अर्धशतक झळकावले. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या महिला संघाला केवळ 76 धावा करता आल्या.




बांगलादेशच्या फलंदाजांचा 'फ्लॉप शो'


बांगलादेश महिला संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा मोसम्मत इवा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. बांगलादेशचे दोनच फलंदाज असे होते जे दुहेरी आकडा गाठण्यात यशस्वी ठरले. यामध्ये फहमिदा चोया (18 धावा) आणि झुरिया फिरदौस (22 धावा) यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला चांगली फलंदाजी करता आली नाही. बांगलादेशने 55 धावांत केवळ 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतर त्यांची गाडी रुळावरुन घसरली.


आयुषी शुक्ला हिने केली दमदार गोलंदाजी 


भारताकडून आयुषी शुक्ला हिने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय पुरुनिका सिसोदिया आणि सोनम यादव यांनी 2-2 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. या गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना एक पण संधी दिली नाही आणि त्यामुळे बांगलादेशचा संपूर्ण संघ 76 धावांत ऑलआऊट झाला.




19 वर्षांच्या गोंगडी त्रिशा हिने भारतासाठी अप्रतिम कामगिरी केली. तिने 47 चेंडूत 52 धावांची खेळी खेळली, ज्यात 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. कर्णधार निक्की प्रसादने 12 धावा केल्या. मिथिला विनोदने 17 धावांचे योगदान दिले तर आयुषी शुक्लाने 10 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया 100 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरली. दुसरीकडे बांगलादेशकडून फरझाना इस्मीनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.


हे ही वाचा -


Ind vs Aus 4th Test : जसप्रीत बुमराह करणार टीम इंडियाचं नेतृत्व? बॉक्सिंग-डे कसोटीआधी नेमकं काय घडलं?