India at 200 in T20Is: Know all stats and numbers : भारतीय संघ आज आपला 200 वा टी 20 सामना खेळत आहे. भारताशिवाय फक्त पाकिस्तान संघाने 200 टी20 सामने खेळले आहेत. 2006 मध्ये सुरु झालेला प्रवास अद्याप सुरुच आहे. आतापर्यंत या कालावधीत भारतीय संघाने अनेक विक्रम केले आहेत. भारतीय संघाने टी20 चा पहिला विश्वचषक जिंकला होता. 


भारतीय संघाने आतापर्यंत 199 टी 20 सामन्यात 127 विजय मिळवले आहेत. भारतापेक्षा जास्त विजय पाकिस्तान संघाचे आहे. पाकिस्तानने 223 सामन्यात 134 विजय मिळवले आहेत. टी 20 मध्ये भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या 260 आहे. 2017 मध्ये श्रीलंकाविरोधात भारताने ही धावसंख्या उभारली होती. टी20 मधील भारताची निचांकी धावसंख्या 74 इतकी आहे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय संघ अवघ्या 74 धावांवर आटोपला होता. भारतीय संघाने पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. 2007 मध्ये झालेल्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाचे चषकावर नाव कोरले होते. 


भारतीय संघाचा टी20 क्रिकेटमधील दोन दशकांच्या प्रवासातील काही खास आकडेवारी आणि विक्रम पाहूयात....


1st T20I match पहिला टी 20 सामना - 


भारतीय संघाचा पहिला टी 20 सामना एक डिसेंबर 2006 रोजी झाला होता. दक्षिण आफ्रिकाविरोधातील या सामन्यात भारतीय संघाने सहा विकेटने विजय मिळवला होता.  


पहिल्या टी 20 सामन्यात कर्णधार कोण?


भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात विरेंद्र सेहवाग भारताचा कर्णधार होता. या सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला होता. 


100th T20I match 100 व्या टी 20 सामन्यात काय झालं ?


भारतीय संघाने आपला 100 वा टी 20 सामना आयर्लंड विरोधात 27 जून 2018 रोजी खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाने 208 धावांचा डोंगर उभारला होता. रोहित शर्माने 97 धावांची खेळी केली होती. भारताने हा सामना 76 धावांनी जिंकला होता. 


200th T20I match 200 वा सामना कुठे आणि कुणाविरोधात होत आहे?


आज, 3 ऑगस्ट रोजी भारतीय संघ आपला 200 वा टी 20 सामना खेळत आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअममध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सामना होत आहे. 


Journey from 1st T20I - 100th T20I - 200th T20I


पहिल्या 100 सामन्यासाठी भारतीय संघाला 4226 दिवस लागले होते. 2006 ते 2018 या कालावधीत भारतीय संघाने 100 सामने खेळले. त्यानंतर 1863 दिवसात भारतीय संघाने पुढील 100 सामने खेळले आहेत. 


Best win-loss record among full-member nations


बांगलादेशविरोधात भारतीय संघाचे विजयाचे सर्वोत्तम रेकॉर्ड आहे. बांगलादेशविरोधात भारतीय संघाने 91.66 टक्के सामने जिंकले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आतापर्यंत 12 टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाला फक्त एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. 


Record against Pakistan in T20Is पाकिस्तानविरोधात कसा आहे रेकॉर्ड 


भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय टी20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तीन सामन्यात पाकिस्तानचा विजय झालाय. 


Highest total सर्वोच्च धावसंख्या 


भारताची टी20 मधील सर्वोच्च धावसंख्या श्रीलंकाविरोधात आहे. 2017 मध्ये श्रीलंकाविरोधात भारतीय संघाने पाच विकेटच्या मोबदल्यात 260 धावांचा डोंगर उभारला होता. 


Lowest total निचांकी धावसंख्या 


भारताची टी 20 मधील निचांकी धावसंख्याही श्रीलंकाविरोधातच आहे. 2008 मध्ये भारतीय संघ लंकाविरोधात 74 धावांत आटोपला होता.  


Highest run-scorer सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर -


टी 20 मध्ये भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. विराट कोहलीने 115 सामन्यात 4008 धावा केल्या आहेत... विराट कोहली भारताकडूनच नव्हे तर जगातील सर्वाधिक धावा असणारा खेळाडू आहे. 


Highest wicket-taker सर्वाधिक विकेट कुणाच्या नावावर


युजवेंद्र चहल याने भारताकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. चहल याने टी 20 मध्ये 91 विकेट घेतल्या आहेत. 


Highest individual score वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या


टी 20 भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या शुभमन गिल याच्या नावावर आहे. शुभमन गिल याने 2023 मध्ये न्यूझीलंडविरोधात नाबाद 126 धावांची खेळी केली होती. 


Most centuries सर्वाधिक शतके 


भारताकडून टी 20 मध्ये सर्वाधिक शतके रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहित शर्माने टी20 मध्ये चार शतके ठोकली आहेत. 


Most fiftes सर्वाधिक अर्धशतके


विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक अर्धशतके ठोकली आहेत. विराट कोहलीच्या नावावर 37 अर्धशतके आहेत. 


Best bowling figures सर्वोत्तम गोलंदाजी 


भारताकडून दीपक चहर याने टी20 मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. दीपक चहर याने 2019 मध्ये बांगलादेशविरोधात सात धावांच्या मोबदल्यात सहा विकेट घेतल्या आहेत. 


Most catches सर्वाधिक झेल 


भारताकडून टी 20 मध्ये सर्वाधिक झेल रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहित शर्माने 148 सामन्यात 58 झेल घेतले आहेत.