West Indies vs India 1st T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघ अनुभवी विडिंज संघाला टक्कार देणार आहे. त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडिअमवर पहिला सामना होत आहे. हा सामना भारतासाठी खास आहे. कारण, भारताचा हा 200 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करत आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि रोहित शर्मासारख्या अनुभवी खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. भारतीय संघाचा टी20 क्रिकेटचा इतिहास पहिला तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे विक्रम मोडणं एखाद्या फलंदाजाला सहजासहजी शक्य नाही. रोहित शर्माने भारतासाठी टी 20 मध्ये सर्वाधिक शतके ठोकली आहे.
भारतीय संघाने आतापर्यंत 199 टी 20 सामन्यात 127 विजय मिळवले आहेत. भारतापेक्षा जास्त विजय पाकिस्तान संघाचे आहे. पाकिस्तानने 223 सामन्यात 134 विजय मिळवले आहेत. टी 20 मध्ये भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या 260 आहे. 2017 मध्ये श्रीलंकाविरोधात भारताने ही धावसंख्या उभारली होती. टी20 मधील भारताची निचांकी धावसंख्या 74 इतकी आहे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात भारतीय संघ अवघ्या 74 धावांवर आटोपला होता. भारतीय संघाने पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. 2007 मध्ये झालेल्या विश्वचषकात धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाचे चषकावर नाव कोरले होते.
टी 20 मध्ये रोहित शर्माची दमदार कामगिरी -
रोहित शर्माने भारतासाठी टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकली आहेत. त्याशिवाय भारताकडून सर्वाधिक टी 20 सामने खेळणारा खेळाडूही रोहित शर्माच आहे. रोहित शर्माने भारतासाठी आतापर्यंत 148 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये रोहित शर्माने चार शतके आणि 29 अर्धशतके ठोकली आहेत. रोहित शर्माची सर्वोच्च धावसंख्या 118 इतकी आहे. सर्वाधिक षठकार लगावण्यातही रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने टी 20 मध्ये आतापर्यंत 182 षटकार ठोकले आहेत. याबाबत विराट कोहली खूप दूर आहे. विराट कोहलीने टी 20 मध्ये आतापर्यंत 177 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने भारताकडून टी 20 मध्ये सर्वात वेगवान शतकही ठोकले आहे. त्याशिवाय कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके रोहित शर्माच्याच नावावर आहे.
विराट कोहलीचाही दबदबा -
रनमशिन विराट कोहलीचा टी20 क्रिकेटमध्ये दबदबा आहे. विराट कोहली टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. विराट कोहलीने 115 सामन्यात 4008 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये एक शतक आणि 37 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने टी 20 मध्ये सर्वाधिक चौकार ठोकले आहेत. विराट कोहलीने 115 सामन्यात 356 चौकार मारले आहेत. तर 177 षटकार ठोकले आहेत. चौकार मारण्यात रोहित शर्मा विराट कोहलीच्या मागे आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 348 चौकार मारले आहेत विराट कोहलीने भारतासाठी टी 20 विश्वचषकात सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी 20 मध्ये दमदार कामगिरी केली आहे.