Australia Semi Final world cup 2023 : ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावती द्विशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन विकेट्सने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत, दक्षिण आफ्रिका यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिकाविरोधात होण्याची शक्यता आहे. कारण, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहण्याची शक्यता आहे. 


ऑस्ट्रेलियाची विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी - 


ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात सहा विजयाची नोंद करत सेमीफायनलचे तिकिट मिळवलेय. ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमधील सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाने आठ सामन्यात सहा विजयाची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली होती. पण त्यानंतर त्यांनी दमदार कामगिरी केली. पाहूयात ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची कामगिरी --


8 ऑक्टोबर - 


भारताविरोधात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का बसला. चेन्नईच्या मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 199 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान चार विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. 


12 ऑक्टोबर - 


दक्षिण आफ्रिकेनेही ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 311 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल ऑस्ट्रेलियाचा संघ 177 धावांत गारद झाला. 


16 ऑक्टोबर - 


ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच विकेट्सने पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली. लंकेने प्रथम फलंदाजी करताना 209 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान पाच विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. 


20 ऑक्टोबर  - 


ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 367 धावांचा डोंगर उभरला. प्रत्युत्तरदाखल पाकिस्तान संघ 305 धावांपर्यंत मजल मारु शकला. 



25 ऑक्टोबर - 


ऑस्ट्रेलियाने दुबळ्या नेदरलँड्सचा 309 धावांनी दारुण पराभव केला. कांगारुंनी प्रथम फलंदाजी करताना 399 धावांचा डोंगर उभरला. प्रत्युत्तरदाखल नेदरलँड्स फक्त 90 धावांत ऑलआऊट झाले. 


28 ऑक्टोबर - 


ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 388 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंड संघ 383 धावांपर्यंत मजल मारु शकला. 


4 नोव्हेंबर - 


ऑस्ट्रेलियाने गतविजेत्या इंग्लंडला 33 धावांनी हरवले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 253 धावांत संपुष्टात आला. 


7 नोव्हेंबर - 


ग्लेन मॅक्सवेलच्या द्विशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा 3 विकेट्सने पराभव केला.


मॅक्सवेलची द्विशतकी खेळी - 


ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम  खेळी आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारली. त्यानं प्रतिकूल परिस्थितीत आणि केवळ एका पायावर साऱ्या शरीराचा तोल पेलून १२८ चेंडूंत नाबाद २०१ धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या या खेळीला २१ चौकार आणि १० षटकारांचा साज होता. त्याच्या याच खेळीनं ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात एक रोमांचक विजय मिळवून दिला. या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २९२ धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची १९व्या षटकात सात बाद ९१ अशी दाणादाण उडाली होती. त्या परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेलनं कर्णधार पॅट कमिन्सला हाताशी धरून ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला. त्या दोघांनी आठव्या विकेटसाठी २०२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यात कमिन्सचा वाटा ६८ चेंडूंत नाबाद १२ धावांचा होता.


पुढील सामना - 


11 नोव्हेंबर रोजी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पुण्यात सामना होणार आहे.


आणखी वाचा :


ग्लेन मॅक्सवेल आला, त्याने पाहिले, तो लढला अन् ऑस्ट्रेलियाला जिंकून दिले, बिग शोच्या द्विशतकाचे कौतुक