कोलंबो : भारतीय महिला क्रिकेट संघ ( India women's cricket team) महिला आशिया कप स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. महिला आशिया कप 2024 (Asia Cup 2024) उद्यापासून सुरु होणार आहे. यापूर्वीच्या आशिया कपचं विजितेपद भारतानं मिळवलं होतं. श्रीलंकेत उद्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतानं महिला आशिया कप स्पर्धेत सातवेळा विजेतेपद मिळवलं आहे.
भारताची मोहीम हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्त्वात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापासून सुरु होणार आहे. महिला आशिया कपमधील भारताची पहिली मॅच पारंपरिक विरोधक असलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. ही मॅच दंबुलामध्ये होणार आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये आठ संघ सहभागी झालेले आहेत. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान,संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळचा समावेश आहे. तर, ब गटात श्रीलंका, बांग्लादेश,थायलंड आणि मलेशियाचा समावेश आहे.
दोन्ही गटातील पहिल्या दोन क्रमांकावरील संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीच्या लढती 26 जुलै रोजी पार पडतील. तर अंतिम फेरीची लढत 28 जुलै रोजी होणार आहे.
महिला आशिया कप स्पर्धेचं प्रक्षेपण कुठं होणार?
महिला आशिया कप स्पर्धेचं प्रक्षेपण भारतात डिस्ने हॉटस्टारवरुन केलं जाईल. तर, टीव्हीवरील प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवर केलं जाणार आहे.
महिला आशिया कप स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक Women's Asia Cup 2024: Complete Schedule
19 जुलै :
संयुक्त अरब अमिरात विरुद्ध नेपाळ, दुपारी 2 वाजता
भारत विरुद्ध पाकिस्तान, सायंकाळी 7 वाजता
20 जुलै
मलेशिया विरुद्ध थायलंड, दुपारी 2 वाजता
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश , सायंकाळी 7 वाजता
21 जुलै
भारत विरुद्ध संयुक्त अरब अमिरात ,दुपारी 2 वाजता
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ ,सायंकाळी 7 वाजता
22 जुलै
श्रीलंका विरुद्ध मलेशिया,दुपारी 2 वाजता
बांग्लादेश विरुद्ध थायलंड, सायंकाळी 7 वाजता
23 जुलै
पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरात, दुपारी 2 वाजता
भारत विरुद्ध नेपाळ, सायंकाळी 7 वाजता
24 जुलै
बांग्लादेश विरुद्ध मलेशिया, दुपारी दोन वाजता
श्रीलंका विरुद्ध थायलंड ,सायंकाळी 7 वाजता
26 जुलै
उपांत्य फेरीचा पहिला सामना: दुपारी 2 वाजता
उपांत्य फेरीचा दुसरा सामना : सायंकाळी 7 वाजता
28 जुलै
अंतिम फेरीचा सामना, सायंकाळी 7 वाजता
भारताचा संघ
भारतीय संघ:हरमनप्रीत कौर(कॅप्टन), स्मृती मानधना (उपकॅप्टन), शफाली वर्मा, जेमिया रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), उमा खेत्री (विकेटकीपर),पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभमना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन
राखीव: श्वेता शेरावत,साईका इशाक, तनुजा कन्वर, मेघना सिंग
संबंधित बातम्या :
Rohit Sharma : रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यात खेळण्याची शक्यता, विराट कोहली अन् जसप्रीत बुमराहचं काय?