India vs West Indies 2nd ODI: भारत आणि वेस्ट इंडीज  (IND Vs WI) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या  (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्डेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, भारतानं 50 षटकात 9 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजच्या संघासमोर 238 धावांचं लक्ष्य ठेवलंय. 


भारताकडून सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या कर्णधार रोहित शर्मा (5 धावा, 8 बॉल) स्वस्तात माघारी परतला. शाई होपच्या गोलंदाजीवर त्यानं तिसऱ्या षटकातच आपली विकेट्स गमावली. त्यानंतर रिषभ पंत आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर रिषभ 18 धावांवर असताना बाद झाला. दरम्यान, विराटही मोठी धाव संख्या उभारण्यास अपयशी ठरला. त्यालाही केवळ 18 धावा करत्या आल्या.


भारतानं तीन विकेट्स गमवल्यानंतर केएल राहुल आणि सुर्यकुमार यादवनं संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. केएल राहुलनं 49 तर, सुर्यकुमारनं 64 धावा केल्या. परंतु, अल्झारी जोसेफनं 29 व्या षटकात केएल राहुल आणि 39 व्या षटकात सुर्यकुमारला माघारी धाडलं. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर (24 धावा 42 बॉल), शार्दुल ठाकूर (8 धावा, 15 बॉल), मोहम्मद सिराज (3 धावा 5 बॉल), युझवेंद्र चहलनं नाबाद 11 धावा केल्या. ज्यामुळं भारतीय संघाला 50 षटकात 9 विकेट्स गमावून 237 धावापर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडीजकडून ओडेन स्मिथ आणि अल्झारी जोसेफनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, केमार रोच, जेसन होल्डर, अकेल होसेन आणि फॅबियन ऍलन यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


संघ- 


भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसीध कृष्णा


वेस्ट इंडीजचा संघ:
शाई होप (विकेटकिपर), ब्रँडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमारह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, अकेल होसेन, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, केमार रोच


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha