IND vs WI 5th T20I Live Streaming : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज अखेरचा आणि निर्णायक सामना होणार आहे. पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 4 सामने खेळले गेले आहेत. 4 सामन्यांनंतर मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. वेस्ट इंडिजने सुरुवातीला सलग दोन्ही सामने जिंकले होते. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांत भारताने दमदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली. आता या दोघांमधील पाचवा आणि मालिकेतील निर्णायक सामना रविवारी 13 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे. हा निर्णायक सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकता ते पाहूयात...


कधी सुरु होणार सामना ?


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि अखेरचा T20 सामना रविवार, 13 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. सामना रात्री 8.00 वाजता सुरू होईल. नाणेफेक 7:30 वाजता होणार आहे.


कुठे होणार सामना ?


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा T20 आंतरराष्ट्रीय सामना फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ मैदानावर होणार आहे. चौथाही सामना येथेच झाला होता. खेळपट्टी फलंदाजांना पोषक असल्यामुळे धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


TV वर कुठे पाहाल सामना ?


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा पाचवा T20 आंतरराष्ट्रीय सामना भारतात दूरदर्शनवर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. साडेसात वाजता नाणेफेक होणार आहे. सात वाजल्यापासून या सामन्याचे प्रक्षेपण सुरु होणार आहे. 


लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे ?


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा आणि अखेरचा टी20 सामना फॅनकोडवर आणि जिओ सिनेमावर लाईव्ह पाहता येईल.  


भारत आणि वेस्ट इंडिज हेड टू हेड - 


भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आतापर्यंत 29 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 19 सामने जिंकलेत तर विडिंजला नऊ सामन्यात विजय मिळालाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही.


भारतीय संघाचे टी20 स्क्वाड 


हार्दिक पांड्या (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, यशस्वी जायसवाल, उमरान मलिक, आवेश खान. 


वेस्ट इंडिजचे टी20 स्क्वाड 


निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमन पॉवेल (कर्णधार), ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, शिमरोन हेटमायर, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ओबेद मैकॉय, ओडेन स्मिथ, शाई होप, ओशाने थॉमस, रोस्टन चेस.